Categories: करमाळा

दिल्लीत भाजपचे सरकार,करमाळा भाजपाकडून जोरदार जल्लोष


करमाळा प्रतिनिधी:- भारतीय जनता पार्टीचे सरकार दिल्ली येथे बहुमतामध्ये स्थापन होताच करमाळा भाजपाकडून जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या नेतृत्वामध्ये कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला. गायकवाड चौक करमाळा येथील भाजपा संपर्क कार्यालयासमोर भारत माता की जय,जय भवानी जय शिवाजी,भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा देऊन परिसर दुमदुमून काढला व फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी केली.यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे म्हणाले की आता दिल्लीत भाजपचे सरकार एकहाती बहुमतातने आले आहे.केंद्रातही भाजपाचे सरकार आहे. सामान्य जनतेने केंद्र सरकारच्या कारभारवर, विकासकामावर व एकूणच ध्येयधोरणावर विश्वास टाकल्याने दिल्लीमध्ये भाजपचे सरकार आले.दिल्ली ही देशाची राजधानी असल्याने तिथे भाजपची सत्ता येणे गरजेचे होते.दिल्लीत सरकार आल्यामुळे तेथील जनतेला आता याचा मोठा लाभ होणार असून जागतिक पातळीवर दिल्लीचे महत्व माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली भविष्यात वाढणार आहे.भाजपच्या या विकासाला चालना देणाऱ्या व देश विकासाच्या गतीने पुढे नेणाऱ्या धोरणला दिल्लीतील मतदारांनी बहुमत देऊन पाठिंबा दिला आहे. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव,तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल,सरचिटणीस काकासाहेब सरडे, नितीन झिंजाडे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल पवार, उद्योग आघाडीचे तालुका अध्यक्ष आजिनाथ सुरवसे, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष सोमनाथ घाडगे,सरचिटणीस गणेश वाळुंजकर, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश ननवरे, शहर उपाध्यक्ष राजू सय्यद,नानासाहेब अनारसे,डॉ. किरण शिंदे, कमलेश दळवी, राजेश पाटील, नानासाहेब अनारसे, गौतम दळवी,राजेश पाटील, गणेश वाळुंजकर, सुनील नेटके,
विनोद इंदलकर,महादेव गोसावी,गणेश गोसावी आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

5 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago

प्रा. डॉ. महेश निकत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

  करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…

1 week ago

अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…

1 week ago