Categories: करमाळा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त निखिल चांदगुडे आयोजित महिला गृह उद्योग प्रदर्शन स्तुत्य उपक्रम- दिग्विजय बागल

करमाळा प्रतिनिधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला करमाळा तालुक्यातील महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी त्यांच्या गृह उद्योगांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शिवसेना जिल्हा समन्वयक निखिल भैया चांदगुडे यांनी महिलांसाठी भरवलेला भव्य उद्योग प्रदर्शनाचा उपक्रम स्तुत्य असल्याचे मत मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन शिवसेना जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांनी व्यक्त केले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी भव्य उद्योग प्रदर्शनाचे आयोजन शिवसेना जिल्हा समन्वयक निखिल भैया चांदगुडे यांनी दिनांक 9 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी रोजी छोटू महाराज सिनेमा थिएटर बायपास रोड करमाळा येथे केले आहे. या महिला उद्योग प्रदर्शनाच्या उद्घघाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
या प्रदर्शनाचे आयोजन सलग तीन दिवस असून प्रदर्शनातील स्टॉल बुकिंग ची सुरुवात झालेली आहे. स्टॉलची अरेंजमेंट-टेबल व खुर्ची व्यवस्थित विभागणी व्यवस्थापनाकडून केली आहे. या कार्यक्रमामध्ये खास महिलांसाठी करमाळ्यातील नामांकित डेव्हलपर्स तर्फे प्लॉट खरेदी व घर खरेदी वर आकर्षक सूट व गिफ्ट मिळणार आहे. सरकार तर्फे महिलांसाठी असलेल्या योजनांची माहिती देणे व वाटप होणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून यश कल्याणासाठी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील होते. महिला सक्षमीकरणासाठी ‌ निखिल चांदगुडे ‌ यांनी आयोजित केलेला ‌ महिला गृह उद्योग प्रदर्शन मेळावा ‌ करमाळा तालुक्यातील ‌ पहिलाच उपक्रम असून उद्योग व्यवसायात भरारी घेण्यासाठी महिला भगिनींना ‌ दिलेले व्यासपीठ ‌ नक्कीच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेनेच्या 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण या धोरणानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचा समाजसेवा चा वारसा जपण्याचे काम सामाजिक उपक्रमाद्वारे करून एक आदर्श निर्माण केला आहे.
या महिला गृह उद्योग प्रदर्शनामध्ये करमाळा शहर तालुक्यातील महिला उद्योजकांनी यामध्ये सहभाग नोंदवला असून या कार्यक्रमामुळे आपल्या उद्योग व्यवसायांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे काम शिवसेनेच्या माध्यमातून निखिल भैया चांदगुडे यांनी केले असल्याने महिला वर्गातून त्यांचे कौतुक होत आहे. या महिला उद्योग प्रदर्शन कार्यक्रमास करमाळा शहर व तालुक्यातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून महिला उद्योगांना मिळत असलेल्या प्रोत्सानामुळे शिवसेनेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सत्कार युवा सेना जिल्हा समन्वयक व या प्रदर्शनाचे आयोजक निखिल चांदगुडे यांनी केला.यावेळी कृषी उत्पन्न समितीचे मा. सभापती शिवाजी बंडगर, यशकल्याणी संस्थेचे प्रा. गणेश करे-पाटील, भाजपचे अध्यक्ष जगदीश अगरवाल, मकाईचे संचालक सतीश नीळ, सा. कमलाई नगरीचे संपादक जयंत दळवी, अँड प्रियाल अगरवाल, नाना करंडे, विकी शिंदे, शिवसेना पदाधिकारी मान्यवर, चांदगुडे परीवार व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

12 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

16 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

17 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago