Categories: करमाळा

कुकडीचे ओव्हरफ्लो पाणी कोळगाव धरणात सोडण्याची मागणी

करमाळा प्रतिनिधी. करमाळा तालुक्यातील पूर्व भागातील शेतकरी बांधवांची जलदायनी म्हणून उपयुक्त असलेल्या कोळगाव धरणात तीन वर्षे प्रतीक्षेनंतर पाणी आले आहे. त्यामुळे शेतकरी बांधव आनंदीत झाले आहेत. यापूर्वी धरणात सलग तीन वर्षे उपयुक्त पाणी साठा नसल्यामुळे पूर्व भागातील शेतकरी अत्यंत हवालदिल झालेला होता. पाणी साठा अत्यंत कमी होता त्यामुळे तोही पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आला होता. मागील वर्षी अनेक वेळा कुकडी प्रकल्पाचे ओव्होरफ्लोचे वाहून जाणारे पाणी धरणात सोडण्याची मागणी केली होती परंतु प्रशासनाने या कडे दुर्लक्ष केले होते. या वर्षीही पूर्व भागातील शेतकरी बांधवांची मागणी आहे की, सिना कोळगाव धरण परिसरात आणखीन एकही मोठा पाऊस झाला नाही त्यामुळे धरण पूर्ण भरते का नाही याची शास्वती नाही त्यामुळे कूकडी प्रकल्पाचे अतिरिक्त वाहून जाणारे ओव्होरफ्लोचे पाणी सिना नदीत सोडून सिना कोळगाव धरणात सोडावे. यावर्षी अहमदनगर जिल्ह्यात सिना नदी पाणलोट क्षेत्रात पाऊस भरपूर झाल्यामुळे व अहमदनगर जिल्ह्यातील निमगाव गांगडी धरण पूर्ण भरल्या मुळे सिना नदीत पाणी वाहत आहे. ते पाणी धरणात आले आहे. या पाण्याचे विधिवत पूजन करून खणा, नारळाची ओटी भरून आलेल्या पाण्याचे पुजन नेरले ग्रामपंचायत माजी सरपंच औदुंबरराजे पाटील, निमगाव ह सरपंच प्रतिनिधी व सीना कोळगाव धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सतीश नीळ पाटील, उपसरपंच विठ्ठल जगदाळे, कर्मवीर मधुकरराव नीळ बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष राजेंद्र भोसले, ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ ननवरे, ज्येष्ठ नागरिक आंबऋषी भील, माजी सदस्य गोकुळ साळुंखे, बप्पा रोकडे, कालिदास नीळ, अजिनाथ टाळके, ग्रामपंचायत शिपाई बाबासाहेब जगताप व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

गोमातेच्या पूजनातून गोसेवेचा संदेश; गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन संस्थेत वसुबारस उत्साहात साजरी

करमाळा  प्रतिनिधी भारतीय संस्कृतीत गोमातेला अत्यंत पवित्र आणि पूजनीय स्थान असून, गोसेवा ही श्रद्धा, संस्कार…

12 hours ago

यशवंत शिंदे यांची नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी! ४१ व्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकमाढा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

करमाळा प्रतिनिधी  निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा…

2 days ago

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना पुरी (ओडिशा) येथे ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…

2 days ago

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

3 days ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

1 week ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

2 weeks ago