Categories: करमाळा

करमाळा येथे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सवाची जय्यत तयारी सुरू .

करमाळा प्रतिनिधी शिवजयंती उत्सव समिती करमाळा यांच्यावतीने करमाळा शहर व तालुका च्या वतीने 395 व्या शिवजयंतीची तयारी अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने करमाळा येथे विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे .यामध्ये 18 तारखेच्या मध्यरात्री 12 वाजता फटाक्यांची आताशबाजी करून , छत्रपती शिवरायांच्या नावाचा जयघोष करून 19 फेब्रुवारी च्या दिवसाची सुरुवात केली जाणार आहे.सकाळी 7 वाजता दुग्धा अभिषेक करून छत्रपती शिवरायांच्या मूर्तीस वंदन करून सकाळी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे .यामध्ये करमाळा शहरातील प्राथमिक शाळा हायस्कूल कॉलेज तसेच ग्रामीण भागातील जी प प्राथमिक शाळा , हायस्कूल , कॉलेज मधील शिक्षक- विद्यार्थी यांच्या माध्यमातून लेझीम नृत्य , टीपऱ्या नृत्य, ग्रृप डांस व सामाजीक संदेश देणारे पथनाट्य सादर केले जाणार आहे. नवीन वक्ते व विचारवंत, वाचकवर्ग तयार व्हावेत यासाठी भाषनेही घेतली जातात यामध्ये भरपूर जण सहभाग नोंदवतात. करमाळ शहरातील व ग्रामीण भागातील लेझीम संघ विशेष सहभाग नोंदवतात तसेच मल्लखांब , मर्दनी खेळ अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे .सर्वात महत्त्वाचे शिवजयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर घेतले जाते यामध्ये रक्तदात्यांची संख्या ही फार मोठी असते रक्तदानास सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात होते यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवण्याचे आवाहन शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. अशाप्रकारे शिवजयंतीच्या निमित्ताने सकाळी विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
शिवजयंती उत्सव समिती करमाळा शहर व तालुक्याच्या वतीने सर्वांना सुचित करण्यात येते की 395 व्या जयंती निमित्त 19 फेब्रुवारी वार बुधवार रोजी सायंकाळी 4 वाजता किल्ला वेस महादेव मंदिर करमाळा येथून छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य दिव्य अशी मिरवणूक निघणार आहे मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून ही मिरवणूक निघणार आहे या मिरवणुकीचे स्वरूप जय गणेश डीजे साऊंड व लाईट पुणे , नागनाथ लेझीम संघ शेटफळ , चाऊस बँड वैजापूर , सुजित बँड वाशी , अमर बँड बारामती , रज्जाक भाई बँड करमाळा , झंकार बँड करमाळा ,भाई भाई बँड करमाळा ,दोस्ती बँड करमाळा , अनिकेत फोटोग्राफी ,एस के लीड वाल वCO2 पेपर ब्लास्टर , तसेच घोडे व उंट हे मिरवणुकीचे मुख्य आकर्षण असणार आहे , छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व मिरवणुकीतील सजावट माही डेकोरेशन व मराठा मंदिर डेकोरेशन हे करणार आहेत असे विविध प्रकारचे सकाळी व सायंकाळी कार्यक्रमाचे नियोजन शिवजयंती उत्सव समिती करमाळा च्या वतीने करण्यात आले आहे .या कार्यक्रमास करमाळा शहर व तालुक्यातील सर्वच शिवभक्त बांधवांनी सकाळी 7 वाजता छत्रपती चौक करमाळा व सायंकाळी 4 वाजता किल्ला विभाग महादेव मंदिर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

सोगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी माजी आमदार शिंदे गटाच्या सरडे यांची बिनविरोध निवड

करमाळा प्रतिनिधी सोगांव ग्रामपंचायत च्या उप- सरपंच पदी करमाळा विधानसभा मा.आमदार श्री संजय (मामा) शिंदे…

18 hours ago

आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत मुथा नॉलेज फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांची सुवर्णभरारी 57 विद्यार्थ्यांपैकी 48 विद्यार्थ्यांनी मिळवले मानाचे यश; गुणगौरव व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न

करमाळा  प्रतिनिधी: करमाळा शहरातील मुथा नॉलेज फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन…

1 day ago

खोलेश्वर महादेवाला पावसासाठी साकडे नगराध्यक्ष मोहिनी सावंत व नगरसेवक संजय सावंत दाम्पत्याच्या हस्ते पूजा-अभिषेक तीन दिवसांचा धार्मिक उपक्रम

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा शहर व परिसरात समाधानकारक पाऊस पडावा, शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा,…

2 days ago

आदिनाथचा लिलाव ही तालुक्यासाठी अतिशय दुर्दैवी घटना : संचालक डॉ.अमोल घाडगे

* करमाळा(प्रतिनिधी)- तालुक्यातील सहकाराचे,सभासद शेतकऱ्यांच्या मालकीचे मंदिर असलेला आदिनाथ कारखाना,ही शासकीय दरानुसार सुमारे ५०० कोटी…

2 days ago

सरकार मित्र मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला अलोट गर्दी* *स्वरांजली ऑर्केस्ट्रा’च्या सादरीकरणाने मिरवणुकीत रंगत; विविध उपक्रमांनी गणेशोत्सवाची सांगता

करमाळा प्रतिनिधी – सरकार मित्र मंडळाच्या गणेशोत्सवाची सांगता उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात गणेश विसर्जन मिरवणुकीने…

2 days ago

सरकार मित्र मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीला अलोट गर्दी ढोल-ताशांचा गजर भक्तिमय वातावरणात गणरायाला निरोप

करमाळा : प्रतिनिधी – सरकार मित्र मंडळाच्या गणेशोत्सवाची सांगता गणेश विसर्जन मिरवणुकीने उत्साहपूर्ण आणि भक्तिमय…

2 days ago