Categories: करमाळा

महाराष्ट्राचे डिजिटल मिडिया धोरण जाहीर व्हावे, यासाठी पाठपुरावा संघटनेच्या मुंबईतील बैठकीत राजा माने यांची माहिती

मुंबई : राजस्थान सरकारप्रमाणेच महाराष्ट्र सरकारनेही डिजिटल मिडिया धोरण लागू करावे, यासाठी संघटनेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याची माहिती डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांनी दिली. मुंबईच्या मालाड येथील राजोरा बँक्वेट हॉल येथे राजा मानसाहेबांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई शहर व उपनगरातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत मार्गदर्शन करताना माने यांनी संघटनेचा इतिहास, राज्यभर वाढलेली व्याप्ती, पत्रकारांच्या कुटुंबियांसाठी सुरू करण्यात आलेल्या प्रतिबिंब प्रतिष्ठानची माहिती दिली. तसेच, संघटनेच्या 6 एप्रिल रोजी होणाऱ्या अधिवेशनासह संघटनेची पुढील दिशा सांगितली.

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष संजय भैरे यांच्या नेतृत्वात मुंबईत कार्यरत असलेल्या डिजीटल मिडिया पत्रकार व संपादकांच्यावतीने राजा माने यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी, अनेक मान्यवर व स्थानिक पत्रकार उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना, माने यांनी डिजिटल मिडिया धोरण व प्रतिबिंब प्रतिष्ठानबद्दल माहिती दिली. आपल्या संघटनेचा पत्रकार कुटुंबवत्सल असला पाहिजे, उद्योगी (व्यवसायिक) असला पाहिजे, पण खंडणीखोर अजिबात असता कामा नये. कारण, संघटनेच्या माध्यमातून डिजिटल मीडियातील पत्रकारांना आता कुठे प्रतिष्ठा मिळत आहे, समाजमान्यता मिळत आहे, शासन मान्यताही लवकरच मिळेल. त्यासाठी, संघटनेचे सर्व पदाधिकारी जोमाने तालुका ते मंत्रालय स्तरावर धडक देत आहेत. संघटनेचा अध्यक्ष मी असलो तरी संघटनेचं काम हे आपण, आम्ही म्हणूनच पुढे जात आहे. संघटनेचा प्रत्येक घटक इथे महत्त्वाचा आहे. त्याच माध्यमातून, डिजिटल मिडिया धोरण राबवण्यासाठी आपण पाठपुरावा करत असल्याचे मानेसाहेबांनी सांगितले.

वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार

संघटनेचे मुंबई अध्यक्ष संजय भैरे यांनी माने यांच्या वाढदिवसानिमित्त संगीत सकाळ आणि स्नेहभोजनाचाही कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी, मुंबईतील कामगार संघटनेचे नेते अभिजीत राणे, डिजिटल मिडिया संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य मयूर गलांडे, ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल वाघुले, सचिव यतीन पवार, मुंबई विभागातील पदाधिकारी,विविध संघटनांचे पदाधिकारी, स्थानिक पत्रकार आणि मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी अध्यक्ष भैरे यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त करताना मानेंच्या पत्रकारितेतील प्रवासाचे आणि संघटनेच्या वाटचालीचे विशेष कौतुक केले.

saptahikpawanputra

Recent Posts

यशवंत शिंदे यांची नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी! ४१ व्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकमाढा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

करमाळा प्रतिनिधी  निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा…

4 hours ago

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना पुरी (ओडिशा) येथे ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…

9 hours ago

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

1 day ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

6 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago