Categories: करमाळा

किंडरजॉय सी. एस. सी. बालविद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

करमाळा प्रतिनिधी 
किंडरजॉय सी. एस. सी. बालविद्याल श्रीदेवीचामाळ करमाळा या बालविद्यालयाचे स्नेहसंमेलन दिनांक १५/०२/२०२५ रोजी अथर्व मंगल कार्यालय येथे उत्सहात पार पडला. बालविद्यालयाच्या स्नेहसंमेलनला पालकांनी उस्फुर्त सहभाग घेऊन बालगोपाळांच्या कलागुणांना दाद दिली. बालविद्यालयाच्या स्नेहसंमेलनामध्ये सामाजिक बंधुभाव, देशप्रेम , पारंपरिक लोककलांचा बहारदार कार्यक्रम गीतांच्या माध्यमातून प्रस्तुत केला. बाळगोपाळांना आपल्या रंगतदार काकार्यक्रमानी प्रेक्षकांची मने जिंकली. सदर कार्यक्रमात बालविद्यालयातील सर्व वयोगटातील मुलांनी सहभाग नोंदवून स्नेहसंमेलनाच खरा आनंद घेतला. लहान वयातच मुलांमध्ये स्टेज डेरिंग निर्माण करण्याचा हेतू या कार्यक्रमाच्या माध्यमातून साधला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रा. जयप्रकाश बिले (माजी प्राचार्य यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा) व प्रा. गणेश करे पाटील (संस्थापक यशकल्याणी समाजसेवा संस्था करमाळा) यांची उपस्थिती होती. अध्यक्षीय भाषणातून प्रा. जयप्रकाश बिले व प्रा. गणेश करे पाटील यांनी संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्या देऊन संस्थेला सदैव सहकार्य राहील असे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे पूर्ण कोरिओग्राफर सिद्धी कदम यांनी केले. तसेच प्रा. लवटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री.धनराज कांबळे, सचिव सौ.राजश्री कांबळे, सौ . मीनाक्षी ढाळे , सौ .सुप्रिया जोगदंड , सौ . सिमा खराडे सौ . बुराडे सौ . श्यामली राखुंडे सौ . अर्चना जाधव विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून प्रा. नागेश माने, लावंड सर, नरुटे सर, सोनावणे साहेब, कदम साहेब, विशाल शिंपी सर, असादे मॅडम, नलिनी जाधव, डॉ. शेलार, डॉ. भोसले, व सर्व पत्रकार बंधू आवर्जून उपिस्थत होते.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

1 day ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

2 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

3 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

3 days ago