Categories: Uncategorized

शासनाने भावांतर भुगतान योजना लागू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा : शंभूराजे जगताप यांची पणनमंत्री ना .रावल यांचेकडे मागणी*

करमाळा प्रतिनिधी हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल विक्री होत असेल तर हमी भाव व मार्केट मधील दर या दरातील फरकाची रक्कम शेतकऱ्यांना अनुदान रूपाने भावांतर भुगतान योजनेअंतर्गत दिली जावी अशी मागणी जगताप गटाचे युवानेते तथा करमाळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंभूराजे जगताप यांनी राज्याचे पणनमंत्री ना जयकुमार रावल यांचेकडे केली आहे . पुणे येथे बाजार समित्यांची राज्यस्तरीय परिषद आयोजीत केली होती .या प्रसंगी जगताप यांनी ना . रावल यांची भेट घेवून चर्चा केली . मध्यप्रदेश सरकारने अशा प्रकारे ” भावांतर भुगतान योजना “राबवून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा दिला होता त्याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील बाजार समितीमध्ये विक्री केलेला शेतमाल व हमीभाव दर यातील फरकाची रक्कम भावांतर भुगतान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान रूपाने देऊन दिलासा द्यावा . उदाहरणार्थ जर तुरीला हमी भाव दर ७५५० रुपये क्विंटल इतकाआहे व सध्या मार्केटमध्ये तूर ७००० रुपये क्विंटल इतक्या दराने विक्री होत असेल तर ५५० रुपये अनुदान रूपाने शासनाने शेतकऱ्यांना द्यावेतअशी मागणी जगताप यांनी केली आहे . यावेळी पणनमंत्री रावल यांनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी तब्बल तीन दशके बाजार समितीचे सभापती पदी केलेल्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले .

saptahikpawanputra

Recent Posts

अखंड हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला करमाळ्यात भव्य रक्तदान शिबीर

करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…

17 hours ago

जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना; १ मार्च रोजी पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी होणार-पृथ्वीराज पाटील

करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…

21 hours ago

बार्शीचे मा.आमदार राजाभाऊ राऊत यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी – माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…

1 day ago

डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांना दुबईत “पत्रकाररत्न” आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…

1 day ago

यशवंत परिवाराच्या वतीने स्व. अर्जुन तात्या फंड सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…

2 days ago

विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांना पितृशोक; अर्जुन तात्या फंड सर यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…

2 days ago