Categories: Uncategorized

उपजिल्हा रुग्णालय करमाळा नवीन इमारत लवकरच रुग्णांच्या सेवेत… अधिकारी व कर्मचारी वसाहतीचे कामही प्रगतीपथावर माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी केली कामाची पाहणी …


करमाळा प्रतिनिधी
२०१९ ते २४ या कार्यकाळात अनेक महत्त्वाच्या योजनांसाठी माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी मतदार संघाच्या विकास कामांसाठी आणलेला होता. त्या पैकी करमाळा उपजिल्हा रुग्णालय नवीन इमारत बांधकाम करणे व अधिकारी कर्मचारी वसाहत बांधकाम करणे या २ कामांसाठी तब्बल ४३ कोटी निधी त्यांनी मंजूर करून आणला होता .ही दोन्हीही कामे आता पूर्णत्वाकडे आलेली आहेत. लवकरच त्याचे लोकार्पण होणार असून या कामाची पाहणी आज दि.२८ रोजी माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी केली. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभाग करमाळा, उपजिल्हा रुग्णालय येथील अधिकारी कर्मचारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.करमाळा तालुक्याच्या दृष्टीने आरोग्य क्षेत्रातील हे अतिशय महत्त्वाचे काम आहे.
या कामासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून संकीर्ण प्रशामा-२०२१/प्रक्र-१३१/आ-अ, दि.०१ जुलै २०२१ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली तर तांत्रिक मान्यता पत्र क्र. जा.क्रं. मुअपु/का-२/इमा-१/९५४/२०२२ दि.१५ फेब्रुवारी २०२२ रोजी मिळाली.तर ओंकार कन्स्ट्रकशन, पुणे यांना कार्यारंभ आदेश जाक्र/साबाविअ/निविदा/३७३६/सन २०२२ दि.२८ नोव्हेंबर २०२२ रोजी मिळाला. हे काम नोव्हेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते परंतु ते पूर्ण झाले नाही.

[ ] अशी असेल उपजिल्हा रुग्णालयाची नवीन इमारत –
सदर इमारत ही तळमजला आणि इतर दोन मजले असली आहे.एकूण 7320.21 चौमी बांधकामाचे क्षेत्रफळ आहे. यामध्ये बेसमेन्ट मजल्यावरती
वाहनतळ ,ऑक्सीजन सिलेडर स्टोअर असणार आहे.तळ मजल्यावर तपासणी केंद्र, एलडीआर-1 आणि एलडीआर-2, विलगीकरण कक्ष, (Isolation ward), एचडीयू, चाइल्ड ओपीडी, एएनसी वॉर्ड, ऑपरेशन थिएटर टॉयलेट प्रस्तावीत आहेत.पहिल्या मजल्यावर पीएनसी वॉर्ड, पेडियात्रिक वॉर्ड, आयसीयू, फिमेल सर्जिकल वॉर्ड, फिमेल मेडिकल वॉर्ड, डायालिसीस सेंटर असणार आहे तर दुसऱ्या मजल्यावर मेल सर्जिकल वॉर्ड, मेल मेडिकल वॉर्ड, वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, कॉन्फरन्स रूम, संगणक रुम असणार आहेत. याशिवाय भूमिगत पाण्याची टाकी, सेप्टीक Tank, रेनवाटर हार्वेस्टिंग, भूविकास (पार्कस आणि गार्डन ), अंतर्गत रस्ते संरक्षक भिंत व गेट व विद्युत विषयी कामांचा समावेश आहे. आतापर्यंत या कामावर १७३३.६७ लक्ष खर्च झालेला आहे. उपजिल्हा रुग्णालय नवीन इमारत बांधकाम पूर्ण झाले असून दरवाजे, खिडक्या व रंगकाम सध्या बाकी आहे .हे काम पूर्ण झाले की इमारत रुग्णांच्या सेवेत दाखल होणार आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

13 hours ago

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

19 hours ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

4 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

5 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

6 days ago