Categories: करमाळा

करमाळा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेची नुतन कार्यकारणी जाहिर- दिनेश मडके

करमाळा प्रतिनिधी ‌डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने साहेब प्रदेश उपाध्यक्ष सतीश (भाऊ) सावंत सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रवीण नागणे यांच्या मार्गदर्शनाखाली डिजीटल मिडिया संपादक पत्रकार संघटना शाखा करमाळा कार्यकारणी करमाळा तालुका अध्यक्ष दिनेश उद्धवराव मडके यांनी करमाळा येथील शासकीय विश्रामगृह येथे १ मार्च रोजी आयोजित कार्यकारिणी निवड बैठकीत जाहीर केली आहे .करमाळा तालुका उपाध्यक्षपदी टी. व्ही 9 मराठीचे शितलकुमार मोटे , कमलाईनगरीचे संपादक जयंत दळवी, करमाळा लाईव्हचे संपादक गौरव मोरे यांची निवड करण्यात आली आहे. तर सचिवपदी नरेंद्रसिंह ठाकुर,यांची पुनश्च फेरनिवड करण्यात आली आहे सहसचिवपदी सुर्यकांत होनप खजिनदारपदी ॲड सचिन हिरडे सहखजिनदार किशोरकुमार शिंदे तालुका संघटक राजू सय्यद सहसंघटक तुषार जाधव तालुका संपर्कप्रमुख अंगद भांडवलकर सहसंपर्कप्रमुखपदी सागर गायकवाड, तालुका व्यवस्थापक संजय साखरे तालुका प्रसिद्धीप्रमुख प्रफुल्ल दामोदरे तालुका प्रवक्तेपदी प्रा.नंदकिशोर वलटे,कार्यवाह नितीन झिंजाडे सहकार्यवाह राजाराम माने यांची निवड करण्यात आली आहे. बैठकीला उपस्थित असणाऱ्या नवनियुक्त सर्व पत्रकार बांधवांना निवड पत्र देऊन सन्मान करण्यात आला. करमाळा डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे नवनियुक्त प्रवक्ते प्रा. नंदकुमार वलटे यांना शहीद मेजर अमोल निलंगे समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यकारणी सदस्य हर्षवर्धन गाडे, राहुल रामदासी, हरीभाऊ हिरडे,शेखर स्वामी ,संजय मस्कर, सचिन चव्हाण,प्रवीण अवचर ,अविनाश जोशी, संजय कुलकर्णी ,नागेश चेंडगे सचिन जव्हेरी संजय तेली यांची तर ज्येष्ठ सल्लागार सदस्यपदी महेश चिवटे, ॲड बाबूराव हिरडे, नासिर कबीर, अलीम शेख ,आशपाक सय्यद,अशोक नरसाळे, सुहास घोलप डी. जी पाखरे ,आण्णा काळे यांची निवड करण्यात आली आहे.
डिजिटल मिडियाला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्याच अधिवेशनामध्ये यांनी शासनमान्यता देण्याचे आश्वासन दिले आहे.विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबत पाठपुरावा चालू असून ‌‌ लवकरच आपल्याला शासन मान्यता मिळणार आहे.केंद्र राज्य शासनामार्फत त्याची प्रकिया सुरू आहे. डिजिटल मीडिया पत्रकार संपादक महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष राजा माने साहेब यांच्या संकल्पनेतून भगिरथ अथक प्रयत्नांमधून डिजिटल मिडिया पत्रकारितेला अधिमान्यता मिळाली आहे.त्यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष प्रवीण नागणे यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना शासकीय सोयी सवलतींचा लाभ मिळवून देणे पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सदैव कटीबध्द राहून काम करणार आहे.
याबरोबरच प्रिंट मिडियाप्रमाणेच डिजीटल मिडियाला शासनाच्या जाहिराती व अधिस्विकृती मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. पत्रकार सुरक्षा विमा योजना पत्रकार कुटुंब कल्याण योजना पेन्शन योजना पत्रकारांना शासन दरबारी नोंद होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या कल्याणासाठी डिजिटल मीडिया पत्रकार संघ काम करीत आहे . राजा माने साहेबांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना शासकीय सोयी सवलतींचा लाभ मिळवून देणे पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सदैव कटीबध्दा राहून काम करणार आहे. सहा एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित दादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये कोकणातील सावंतवाडी येथे अधिवेशन संपन्न होणार आहे .
राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये डिजिटल मीडिया प्रिंट मीडिया क्षेत्रातील महाराष्ट्रातून हजारो पत्रकार उपस्थित राहणार आहेत .या अधिवेशनामध्ये नक्कीच पत्रकारांना दिलासा देणारा निर्णय होऊन‌ शासन मान्यता मिळून पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी कल्याणासाठी हे अधिवेशन ऐतिहासिक ठरणार असून डिजिटल मीडियाचे सर्व पत्रकार बांधव जास्तीत जास्त संख्येने या अधिवेशनात उपस्थित राहणार असल्याचे तालुका अध्यक्ष पत्रकार दिनेश मडके यांनी सांगितले आहे

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

7 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

1 day ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

1 day ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

1 day ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago