Categories: करमाळा

जागतिक महिला दिनानिमित्त जेऊर येथे महिला सन्मान रॅलीसह 4 मार्चपासून महिला महोत्सवाचे आयोजन-सौ. ज्योतीताई नारायण पाटील

करमाळा प्रतिनिधी जागतिक महिला दिनानिमित्त जेऊर येथे महिला सन्मान रॅलीसह आजपासून महिला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन महिलांसाठी विविध स्पर्धा घेतल्या जाणार अशी माहिती सौ. ज्योतीताई नारायण पाटील यांनी दिली. जेऊर येथे आमदार नारायण आबा पाटील मित्रमंडळ व ग्रामपंचायत जेऊर यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. उद्या पासून सुरू होणाऱ्या महिला महोत्सवात दिनांक 4 मार्च रौजी रांगोळी स्पर्धा, उखाणे स्पर्धा व‌फनी गेम्स तर दिनांक 5 मार्च रोजी अंताक्षरी , फनी गेम्स व गायन या स्पर्धा होतील तसेच 6 मार्च रोजी वेशभुषा व अभिनय स्पर्धा तसेच फनी गेम तर या दिवशी महिलांचे फ्रि बी एम आय चेक अप व आहारा विषयक मार्गदर्शन केले जाईल. दिनांक 7 मार्च रोजी पाककला स्पर्धा व वकृत्व स्पर्धा तसेच फनी गेम तर दिनांक 8 मार्च रोजी महिला सन्मान रॅलीसह डान्स स्पर्धा व बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. या सर्व स्पर्धा सुरज मोती फन्कशन हॉल (शिक्षक कॉलनी) जेऊर येथे होतील. या स्पर्धेसाठी समस्त महिला भगिनी नियोजक म्हणुन जबाबदारी पार पाडणार असुन‌ जेऊर व परिसरातील समस्त महिलांनी या महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे. आमदार नारायण आबा पाटील मित्रमंडळ व ग्रामपंचायत जेऊर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या महिला दिनाचे हे २३ वे वर्ष असून महिला दिनाचे आयोजन करण्याची इतकी दीर्घ परंपरा असलेला हा महोत्सव आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

15 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

18 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

20 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago