संजय साखरे प्रतिनिधी बँक ऑफ इंडिया कोर्टी शाखेत प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ कोणत्याही कुटुंबातील कर्त्या माणसाचे निधन झाल्या नंतर त्या कुटुंबाला खरी गरज असते ते मानसिक आणि आर्थिक आधाराची,असाच आधार प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेमुळे एका कुटुंबाला मिळाला आहे. बँक ऑफ इंडिया कोर्टी शाखेचे ग्राहक बाळासाहेब रामभाऊ कुटे रा. कोर्टी याचे 14 जानेवारी 2020 रोजी निधन झाले. त्यांनी कोर्टी शाखेत प्रधानमंत्री जीवन विमा योजने अंतर्गत 330 रुपयाचा वार्षिक विमा हप्ता भरून जीवन विमा संरक्षण घेतले होते त्यामुळे त्यांच्या वारसदार मुलाच्या बँक खात्यामध्ये विम्याची रक्कम रुपये 2,00,000 ( दोन लाख रुपये ) जमा करण्यात आली.
सर्वसामान्य जनतेला कमीत कमी रुपयामध्ये विमा कवच मिळावे म्हनून सरकारने अश्या योजना चालू कल्या आहेत प्रधाममंत्री जीवन ज्योती योजनेमध्ये 18 ते 50 वयोगटातील ग्राहकांना 330 रुपये वार्षिक प्रीमियम भरून रुपये दोन लाखाचे जीवन विमा संरक्षण मिळते तर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेमध्ये 18 ते 70 वयोगटातील ग्राहकांना 12 रुपये प्रीमियम भरून 2 दोन लाखाचे अपघात विमा संरक्षण मिळते. तसेच वृद्धापकाळामध्ये मासिक पेन्शन साठी प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना आहे यामध्ये ग्राहकाच्या वया नुसार मासिक काही रक्कम भरून तो वयाच्या 60 वर्षा नंतर रुपये 1000 ते 5000 पर्यंत पेन्शन घेऊ शकतो.या योजननांचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शाखाप्रमुख श्री शशांक राऊत सर , अधिकारी सतीश पिसाळ, बँक मित्र गणेश जाधव,विनोद झोळ आणि सुनिल काळे यांनी केले आहे.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…