घारगाव ग्रामपंचायतच्या नूतन सरपंच पदी आमदार नारायण आबा पाटील गटाच्या सौ कविताताई संतोष होगले पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.घारगाव ग्रामपंचायत सरपंच पदासाठी ६ मार्च रोजी निवडणूक झाली या निवडणुकीत सौ कविताताई संतोष होगले पाटील यांचा सरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी जगताप-पाटील गटाचे माजी उपसरपंच सतीश पवार तसेच आ.नारायण आबा पाटील गटाचे इतर सर्व सदस्य यामध्ये माजी सरपंच लोचना पाटील, माजी सरपंच आशा देशमुखे ,माजी सरपंच अनिता भोसले, माजी सरपंच सौ लक्ष्मी सरवदे, विद्यमान उपसरपंच दत्तात्रय मस्तुद सर्वजण उपस्थित होते या सर्वांनी सौ कविताताई संतोष होगले पाटील यांची बिनविरोध सरपंच पदी निवड केली
या सरपंच निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी विनोद बनसोडे साहेब यांनी काम पाहिले. सोबत तलाठी हर्षल शेंगळे साहेब तसेच महसूल सहाय्यक सोमनाथ खराडे घारगावचे ग्राम विकास अधिकारी रवींद्र काळे यांनी काम पाहिले .
तसेच मा. सरपंच किरण दादा पाटील मा. सरपंच कल्याण दादा होगले, माजी सरपंच रामलिंग आणा देशमुखे अनेक मतदार बंधू-भगिनी आप्तेष्ट नातेवाईक गावातील ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच निवड कार्यक्रम शांततेत पार पडला त्याबद्दल किरण दादा पाटील यांनी सर्वांचे आभार मानले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय सरवदे यांनी केले.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…