करमाळा प्रतिनिधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्या प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने पुकारलेल्या करमाळा बंदला 100% प्रतिसाद उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प झाले होते.
आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर समोर सकल मराठ्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नायब तहसीलदार विजय रोकडे तसेच पोलीस निरीक्षक यांनी या ठिकाणी भेट दिली असता त्यांना सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर या हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा गुन्हा दाखल करावा अशा जोरदार घोषणा दिल्या यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने विविध मागण्या करण्यात आल्या. यामध्ये स्व. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी स्व. देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवावा माजी मंत्री धनंजय मुंडे यांना सुत्रधार गुन्हेगार घोषित करुन सह आरोपी करण्यात यावे व त्यांचीही सखोल CID मार्फत चौकशी करण्यात यावी, वाल्मीक कराड याला पोलिस कोठडीमध्ये (जेलमध्ये) ज्या सुविधा पुरविल्या जातात त्या तात्काळ बंद करण्यात याव्यात.,स्व. संतोष देशमुख यांना खंडणी मागणीच्या कारणावरुन आडसर होत असल्या कारणाने संतोष देशमुख यांचा निर्दयी, अमानुष खुण करण्यात आला आहे. आवादा कंपनीने ही खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे ही खंडणी प्रामुख्याने धनंजय मुंडे यांच्या व वाल्मीक कराड याच्या आदेशानेच मागण्यात आली होती म्हणून धनंजय मुंडे सुद्धा आरोपी करावे अशा मागण्याचा समावेश आहे.
या मागण्या मान्य करुन स्व. संतोष देशमुख यांच्या कुटूंबीयांना न्याय देण्यात यावा अशी मागणी
सकल मराठा समाज व बहुजन बांधव यांनी निवेदनातून केली आहे
दरम्यान करमाळा तालुक्यामध्ये बंद असताना यामध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू असल्याने व अत्यावश्यक सेवा या चालू ठेवण्यात आलेल्या होत्या. सर्व शाळा ही चालू ठेवण्यात आलेल्या होत्या एसटी बसेस ही चालू ठेवण्यात आलेले होत्या. तरीही शहरातील व्यवहार ठप्प होते. शासकीय कार्यालय मध्येही थोडं लोक दिसून आले. त्यामुळेआज सगळ्या तालुक्यात शंभर टक्के बंद असल्याचे दिसून आले
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…