Categories: Uncategorized

ग्रामीण भागातील महिलांसाठी भरीव योगदान देण्यासाठी आता सामाजिक संघटनानी पुढाकार घ्यावा-सौ.ज्योतीताई पाटील

करमाळा प्रतिनिधी ग्रामीण भागातील महिलांसाठी भरीव योगदान देण्यासाठी आता सामाजिक संघटनानी पुढाकार घ्यावा असे आवाहन महिला नेत्या  सौ.ज्योतीताई  नारायण पाटील यांनी केले. जेऊर ता.करमाळा येथील आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जागतिक महिला दिनानिमित्त जेऊर ग्रामपंचायत आणि आमदार नारायण आबा पाटील मित्रमंडळ यांचे संयुक्त विद्यमाने एका भव्य महिला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात गेले आठवडाभर महिलांसाठी विविध स्पर्धा तसेच आरोग्य तपासणी व‌ मार्गदर्शन शिबीरे आयोजित करण्यात आली होती. विविध स्पर्धामधील विजेत्यांना आज मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली. यात रांगोळी, वक्तृत्व, पाककला, अभिनय, वेशभुषा, डान्स, उखाणे, अंताक्षरी गीत गायन व‌ फनी गेम्स आदिंचा समावेश होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ ज्योती ताई पाटील होत्या तर यावेळी व्यासपीठावर ग्रामपंचायत सदस्या सौ समीरा दोशी, प्रियांका निर्मळ, सुलभा घाडगे, रोहिणी सुतार, परवीन नदाफ, अनिता जगताप, भोसले ताई, ताहिरा शेख, जनाबाई कांबळे, येवले वहिनी, रत्नमाला बादल, उषाताई सरक, वैशाली शिंगाडे आदिसह इतर मान्यवर महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुरुवातीस राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रियांका पाटील यांनी सुरेल गायन केले तर कृष्णाई मोटे हिने कविता सादर केली. यावेळी बोलताना ज्योती ताई पाटील म्हणाल्या की जेऊर येथे ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण घेताना राहण्याची सोय म्हणुन एक होस्टेल उभारले जावे. तसेच होतकरु व हुशार मुलींसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अद्यावत अभ्यासिका उभारली जावी हेच २२ वर्षे अखंडीत पणे महिला दिन साजरे करण्याचे फलीत असेल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्या रोहिणी सुतार यांनी केले तर आभार संयोजिका समृध्दी कुलकर्णी हिने मानले.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

4 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

23 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

1 day ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

1 day ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago