Categories: करमाळा

आमदार नारायण आबा पाटील गटाकडून आजपासून उमेदवार चाचपणी, आदिनाथ ताकदीने लढण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार

जेऊर  प्रतिनिधी: श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असुन विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटाकडून आता जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत अधिक माहिती देताना पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी सांगितले की श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा पाटील कुटुंबातील एक घटक असल्याप्रमाणे आहे. कर्मयोगी गोविंद बापु पाटील यांच्या अथक प्रयत्नानंतर या कारखान्याची उभारणी झाली. यंदाच्या निवडणुकीत आमदार नारायण आबा पाटील यांनी लक्ष द्यावे आणि आदिनाथ कारखान्यास गतवैभव प्राप्त करुन देण्याकरिता हि निवडणूक लढवावी असा सुर सभासदांमधून उमटत आहे. पाटील गटाकडूनही आता जोरदार तयारी सुरू झाली असुन उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी उमेदवार चाचपणी सुरु केली गेली आहे. आमदार नारायण आबा पाटील यांनी आमदार पदाची सुत्र हाती घेतल्यानंतर शंभर दिवसाच्या आत कुकडीची दोन व दहिगाव उपसा सिंचन योजनेचे एक आवर्तन शेतकऱ्यांना मिळवून दिले तसेच चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुध्दा मतदार संघातील महत्वाचे प्रश्न मांडून‌ त्याची सोडवणुक करण्यासाठी मंत्र्यांच्या गाठीभेटीचे सत्र सुरू ठेवले असल्याने नागरिकांतुन आमदार नारायण आबा पाटील यांच्या कार्यपद्धतीवर समाधान व्यक्त केले जात आहे. आता आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीतही सभासद शेतकरी सत्ता बदल‌ करण्याच्या मानसिकतेत आहेत. यामुळे आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीत पाटील गट पुर्ण ताकदीने उतरणार असुन या निवडणुकीत कोणते निर्णय घ्यायचे याचे संपुर्ण अधिकार आमदार नारायण आबा पाटील यांना आहेत. यामुळे आमदार महोदय घेतील तो निर्णय अंतिम असणार आहे. उद्यापासून पाटील गटातील कार्यकर्ते सुचना दिल्यानुसार आपआपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात करतील. यासाठी राजन (अण्णा) पाटील,
बाजार समिती माजी संचालक देवानंद बागल, विद्यमान संचालक नवनाथबापु झोळ तसेच पाटील गटाचे मार्गदर्शक प्रा अर्जुनराव सरक यांचेकडून नियोजन व‌ रणनिती आखली जात असून इच्छुकांनी आमदार पाटील कार्यालयातून माहिती घेऊन आपले उमेदवारी अर्ज भरावेत असे आवाहन करण्यात आले असल्याची माहिती प्रवक्ते सूनील तळेकर यांनी दिली.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

2 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

22 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

1 day ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

1 day ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago