शेतकरी सभासद यांचे हित जपण्यासाठी यंदाच्या वर्षी मकाई सहकारी साखर कारखाना कसल्याही परिस्थितीत चालू करणार-दिग्विजय बागल. रोलर मिलचे पुजन संप्पन.

करमाळा प्रतिनिधी. करमाळा तालुक्यातील शेतकऱ्याच्या अतिरिक्त ऊसाच्या गाळपाचा प्रश्न‌ सोडवण्यासाठी शेतकरी सभासदांच्या ऊसाला योग्य भाव मिळवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तालुक्याचे हरीतक्रांतीचे प्रणेते स्व दिंगबरराव बागल मामा यांनी मकाई सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली असून स्व.मामाचा वारसा आम्ही यशस्वीपणे चालवत असुन शेतकरी सभासद कामगार यांचे हित जपण्यासाठी आदरनीय मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे व देशाचे नेते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या सहकार्याने मकाई सहकारी साखर कारखाना यंदाच्या वर्षी कसल्याही परिस्थितीत चालू करणार असल्याचे मत मकाई कारखान्याचे चेअरमन युवा नेते दिग्विजय बागल यांनी व्यक्त केले . श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे चालू ऊस हंगाम गाळप करण्याच्या दृष्टीने आज रोलर मिलचे पूजन करण्यात आले. मागील वर्षी मकाई बंद ठेवण्यात आला असला तरी या वर्षी कारखाना प्रशासनाच्या वतीने कोणत्या ही परिस्थितीत कारखाना चालू करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. या रोलर मिलचे पूजन कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बागल म्हणाले की, आम्ही सर्व तयारी करुनच चालू ऊस हंगाम गाळप करणार आहोत. सर्व सभासद आणि कामगार बंधूचा आमच्यावर विश्वास असून कोणत्या ही परिस्थितीत कारखाना चालू करणार आहे. जिल्ह्यात इतर कारखान्या सोबतच आम्ही ऊसदरबाबत राहू. मकाईवर ऊस गाळप करणा-या शेतक-यांची संख्या भरपूर आहे. सभासदाचा विश्वास मकाईवरच असून आमच्या कारखाना प्रशासनाच्या वतीने सर्व तयारी करण्यात येत आहे. राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी ही सहकार्य करण्याची सकारात्मक भूमिका घेतली आहे, त्यामुळे चालू हंगाम यशस्वीपणे चालणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावेळी व्हाईस चेअरमन बाळासाहेब भाऊ पांढरे, संचालक रामभाऊ हाके, दत्ताभाऊ गायकवाड, एमडी हरिश्चंद्र खाटमोडे, सर्व विभागप्रमुख, सभासद, कामगार वर्ग उपस्थित होते…

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago