बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पंढरपूर विभागाच्या प्रमुखपदी सतीशभाऊ सावंत यांची निवड

चार तालुक्याची शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची जबाबदारी सतिशभाऊ सावंत यांच्यावर

 सांगोला/प्रतिनिधी गोरगरीब रुग्णांना 24 तास मदत करणारे, रुग्णांच्या अडचणी सोडविण्यासाठी कायम तत्पर असणारे मा. नगरसेवक सतीशभाऊ सावंत यांची वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पंढरपूर विभाग प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. त्यांना निवडीचे पत्र वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष मंगेश चिवटे व प्रमुख रामहरी राऊत यांनी दिले. यामध्ये सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर, माळशिरस या चार तालुक्यांची जबाबदारी सतीशभाऊ सावंत यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेब डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष मंगेशजी चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली आहे. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून गोरगरीब, गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालय 10 टक्के राखीव खाटा उपलब्ध करून देणे, निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांवर पूर्णतः मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यासंदर्भात मदत करणे, महात्मा फुले जन  आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयामध्ये गरजू रुग्णांना शस्त्रक्रिया मोफत करण्यासंदर्भात योग्य मार्गदर्शन व सदैव तत्पर राहून मदत करणे, गंभीर, महागड्या शस्त्रक्रिया करावयाच्या असलेल्या गोरगरीब गरजू रुग्णांना भरीव प्रमाणात अर्थसहाय्य करणे, तसेच पंतप्रधान वैद्यकीय सहायता निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, श्री सिद्धिविनायक ट्रस्ट यासारख्या विविध ट्रस्टच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मदत करावी असे निवडीच्या पत्रात नमूद केले आहे.

 निवडीनंतर प्रतिक्रिया देताना, राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेब, खासदार श्रीकांत शिंदे व या वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर, माळशिरस या चार तालुक्याचा प्रमुख म्हणून माझी निवड केली आहे, माझ्यावर मोठा विश्‍वास टाकला आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून चार तालुक्यातील गोरगरीब रुग्णांना अहोरात्र आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी तसेच वेगवेगळ्या शस्त्रक्रियांसाठी आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी व आरोग्य संदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी अहोरात्र कटिबद्ध आहे. वेळोवेळी आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे घेणार त्याचबरोबर  गोरगरीब रुग्णांच्या मोफत आरोग्याच्या तपासण्या करून मोफत औषधोपचार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सतीशभाऊ सावंत यांनी सांगितले.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा इंग्लिश स्कूल संघटनेच्या नुतन तालुका अध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती

करमाळा प्रतिनिधी  महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…

17 hours ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांना ‘ज्ञानज्योती आदर्श पुरस्कार’ प्रदान

करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…

18 hours ago

गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबतर्फे गणेशोत्सवानिमित्त १६ सप्टेंबरला मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबिराचे आयोजन – प्रशांत ढाळे

  करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…

24 hours ago

२५ सप्टेंबरपासून करमाळ्यात खत विक्रीला ‘FFS’ प्रणाली गुणनियंत्रण कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांचा विक्रेत्यांना इशारा लिंकिंग, काळाबाजार व चढ्या दराने विक्री केल्यास कडक कारवाई

करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…

2 days ago