Categories: करमाळा

आमदार नारायण आबा पाटील यांच्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद, सोलापुर -अजमेर रेल्वेगाडीस जेऊर थांबा मिळणार

जेऊर प्रतिनिधी : आमदार नारायण आबा पाटील यांनी दिनांक २३ डिसेंबर २०२४ रोजी मध्य रेल्वे, सोलापूर मंडल यांना एका लेखी पत्राद्वारे जेऊर रेल्वे स्थानकावर गाडी क्रमांक ०९६२७ – ०९६२८ सोलापूर अजमेर एक्स्प्रेस या साप्ताहिक रेल्वे गाडीस थांबा मिळावा अशी मागणी केली होती. या मागणीचा मध्य रेल्वे सोलापूर मंडल यांचेकडून विचार होऊन एक सकारात्मक अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे. याबाबतची माहिती मध्य रेल्वे सोलापूर मंडलचे वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक श्री योगेश पाटील यांनी आमदार नारायण आबा पाटील यांना एका लेखी पत्राद्वारे कळवली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की आपल्या मागणीनुसार जेऊर रेल्वे स्थानकावर अजमेर-सोलापुर-अजमेर या गाडीचा थांबा दिला जावा का याची सखोल पडताळणी केली. अहवालानुसार आपली मागणी व्यवहार्य असल्याने दिसुन आले असुन पुढील आवश्यक कार्यवाही साठी दि ६ मार्च २०२५ रोजी मध्य रेल्वे मुख्यालय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई यांना सदर अहवाल पाठवला असल्याने या पत्रातुन सांगितले आहे. यामुळे आता अजमेर -सोलापूर- अजमेर एक्स्प्रेसला जेऊर येथे थांबा मिळण्याच्या कामाला गती आली आहे. आमदार नारायण आबा पाटील यांनी आमदार पदाची सुत्र हाती घेतल्यानंतर निवडणुकीपुर्वी जनतेने अथवा नागरिकांनी मांडलेल्या एका एका मागणीवर काम करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार दळण वळणाची सोय, सिंचन, वीज आणि आरोग्य आदि बाबत आमदार नारायण आबा पाटील दाखवत असलेल्या कार्यतत्परतेचे नागरिकांकडून कौतूक केले जात आहे.तर मध्य रेल्वे मुख्यालय मुंबई येथेही स्वतः आमदार नारायण आबा पाटील हे तेथील‌ वरीष्ठ अधिकारी यांची भेट घेणार असल्याची माहिती पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी दिली.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

16 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

20 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

21 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago