Categories: करमाळा

आदिनाथ सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणूक 2025-30 साठी झोळ गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज दाखल

करमाळा प्रतिनिधी आदिनाथ सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणूक 2025-30 साठी गुरुवार दिनांक 13 मार्च रोजी झोळ गटाच्या पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यावेळी पोमलवाडी गटातून प्रा. रामदास मधुकर झोळ,अनुसूचित जाती मतदारसंघातून दशरथ (अण्णा )भीमराव कांबळे, जेऊर गटातून रवींद्र सदाशिव गोडगे, रावगाव गटातून कल्याण सिताराम पाटील, भटक्या विमुक्त जाती मतदारसंघातून रायचंद कृष्णा खाडे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. उर्वरित उमेदवारी अर्ज सोमवारी भरले जाणार आहेत. शेतकरी सभासद कामगार यांच्या हितासाठी शेतकरी सभासद यांच्या पाठबळावर आपण आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवत असल्याचे प्राध्यापक रामदास झोळ सर  यांनी सांगितले.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

17 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

20 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

22 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago