Categories: करमाळा

शेतीत AI तंत्रज्ञानाचा वापर दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या प्राध्यापकांची शेतभेट

करमाळा प्रतिनिधी 
दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन मधील डॉ. सचिन बेरे (एआय आणि डीएस विभाग प्रमुख), प्रा. प्रशांत सूर्यवंशी(स्थापत्य अभियांत्रिकी विभाग प्रमुख), प्रा. शिवाजी भोसले (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख) आणि प्रा. शितल धायगुडे (डीन अकॅडमीक) यांनी स्वामी चिंचोली येथील सौ. सीमा चव्हाण यांच्या एआय शेती प्रकल्पास भेट दिली. यावेळी त्यांनी शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा कसा वापर केला जातो, यावर सखोल चर्चा केली.
AI तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतीत होणारे फायदे आणि त्याच्या उपयोगाबद्दल सविस्तर माहिती दिली. AI तंत्रज्ञानामुळे पिकांच्या आरोग्याचे परीक्षण, कीड व रोगांची ओळख, मातीचा दर्जा आणि हवामान आधारित पिक व्यवस्थापन सहजपणे करता येते. यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन वाढविण्यात आणि खर्च कमी करण्यात मदत मिळत आहे.
चर्चेच्या दरम्यान, AI तंत्रज्ञानाच्या अधिक प्रभावी वापरासाठी कशा प्रकारे सुधारणा केली जाऊ शकते यावर विचार मंथन झाले. प्राध्यापकांनी या तंत्रज्ञानात नवीन गोष्टींचा वापर करून कशा प्रकारे उत्पादनात वाढ करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले. दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन मधील प्राध्यापकांनी भविष्यात या प्रकल्पामध्ये सहकार्य करण्याची संधी आणि शेतकरी आणि तंत्रज्ञान यांचे सुसंवाद साधण्यासाठी उपाय योजनेवर चर्चा केली.
हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरू शकतो, ज्यामुळे शेतकऱ्यांची उत्पादकता वाढेल आणि त्यांना त्यांच्या कामात अधिक मदत मिळेल.
सदर प्रकल्पासाठी सहकार्य करण्यासाठी प्राध्यापक सौ माया झोळ सचिव दत्तकला शिक्षण संस्था यांनी आश्वासन दिले असून डॉ. सचिन बेरे व सीमा चव्हाण यांना आवश्यक सर्व मदत देण्याचे ठरवले आहे. प्रा सौ माया झोळ यांनी सदर प्रकल्पांचे कौतुक केले व अशा प्रकारची एआय टेक्नॉलॉजी ऊस पिकासह इतर पिकांना देखील वापरण्यात यावी असे मत व्यक्त केले.
दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स मध्ये ए आय आणि ए आय डी एस या शाखा सुरू असून ए आय फार्मिंग संबंधी स्वतंत्र स्टार्टअप सुरू करण्याच्या प्रयत्नांना सहकार्य व आर्थिक सहाय्य करण्याचे प्रा. सौ. माया झोळ सचिव दत्तकला शिक्षण संस्था यांनी मान्य केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

यशवंत शिंदे यांची नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी! ४१ व्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकमाढा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

करमाळा प्रतिनिधी  निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा…

36 mins ago

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना पुरी (ओडिशा) येथे ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…

6 hours ago

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

23 hours ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

6 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago