Categories: करमाळा

शेतकरी सभासद यांचे हित जपण्यासाठी आदिनाथ साखर कारखान्याची जेऊर गटातून निवडणूक लढवणार -चंद्रकांत काका सरडे*

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याचे माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन चंद्रकांत काका सरडे यांनी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सभासद व शेतकरी हितासाठी जेऊर गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. चंद्रकांत काका सरडे हे चिखलठाणचे माजी सरपंच प्रगतशील बागायतदार असून आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन तसेच संचालक म्हणून त्यांनी शेतकरी सभासद यांचे हीच जपण्याचे काम केले आहे. माजी आमदार संजय मामा शिंदे यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज सर्वसाधारण ओबीसी राखीवमधुन सोमवार दिनांक 17 मार्च रोजी निवडणूक निर्णय अधिकारी अमोल भोसले सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार सौ शिल्पाताई ठोकडे यांच्याकडे दाखल केला असून शेतकरी सभासद यांच्या कल्याणासाठी व आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे माजी संचालक चंद्रकांत काका सरडे यांनी सांगितले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

3 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

4 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

5 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

5 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

6 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

6 days ago