Categories: करमाळा

भीमा-सीना जोडकालवा परिसरातील शेतीपंप वीजपुरवठा पुर्ववत करावा – आमदार नारायण आबा पाटील

करमाळा प्रतिनिधी भीमा-सीना जोडकालवा परिसरातील शेतीपंप वीजपुरवठा पुर्ववत करावा अशी मागणी आमदार नारायण आबा पाटील यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांचेकडे केली आहे. जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातुन आमदार नारायण आबा पाटील यांनी शेतकऱ्यांना बसणाऱ्या संभाव्य आर्थिक फटका व पिकांची सद्यस्थिती याचा प्रशासनानेही गंभीर विचार करावा असे सुचित केले आहे. याबाबत अधिक बोलताना आमदार नारायण आबा पाटील म्हणाले की भीमा-सीना बोगदा तसेच सीना नदीच्या दोन्ही तीरावरील  शेती पंपाच्या वीज पुरवठ्यात प्रशासनाने कपात केली असुन‌ याचा थेट परिणाम शेतातील उभ्या पिकांवर होत आहे. उजनीतून सीनेचे सोडलेले आवर्तन पुर्ण होईपर्यंत या परिसरातील शेती पंपाच्या वीज पुरवठ्यात खंड पाडला आहे. वास्तविक पाहता यामुळे कंदर,सातोली,केम तसेच दहिवली, उपळवटे,ढवळस, बारलोणी, महादेववाडी, गवळेवाडी, पिंपरी, कव्हे आदि गावाच्या शिवारातील तसेच बोगदा व नदी काठच्या उभ्या पिकांवर‌गंभीर परिणाम होऊ लागला आहे. केळी सारखी नगदी पिके वेळीच पाणी नाही मिळाले तर वाया जातील. यामुळे पिक उत्पादनावर दुष्परिणाम होऊन करोडो रुपयांचे नुकसान होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे आता तातडीने या पिकांना जीवदान देण्यासाठी या भागातील शेतीपंप वीजपुरवठा पुर्ववत करावा व‌ शेतकऱ्यांना मुबलक वीज देण्यात यावी. समोर पाणी असुनही हाताशी आलेली पिके वाया जातील याचा विचार प्रशासनाने वेळीच करावा. सध्या शेतकऱ्यांमध्ये वीज कपातीच्या आदेशामुळे तीव्र‌संताप असुन‌ प्रशासनानेही वेळीच याची दखल घ्यावी असेही आमदार नारायण आबा पाटील यांनी म्हटले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

खोलेश्वर महादेवाला पावसासाठी साकडे नगराध्यक्ष मोहिनी सावंत व नगरसेवक संजय सावंत दाम्पत्याच्या हस्ते पूजा-अभिषेक तीन दिवसांचा धार्मिक उपक्रम

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा शहर व परिसरात समाधानकारक पाऊस पडावा, शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा,…

11 hours ago

आदिनाथचा लिलाव ही तालुक्यासाठी अतिशय दुर्दैवी घटना : संचालक डॉ.अमोल घाडगे

* करमाळा(प्रतिनिधी)- तालुक्यातील सहकाराचे,सभासद शेतकऱ्यांच्या मालकीचे मंदिर असलेला आदिनाथ कारखाना,ही शासकीय दरानुसार सुमारे ५०० कोटी…

15 hours ago

सरकार मित्र मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला अलोट गर्दी* *स्वरांजली ऑर्केस्ट्रा’च्या सादरीकरणाने मिरवणुकीत रंगत; विविध उपक्रमांनी गणेशोत्सवाची सांगता

करमाळा प्रतिनिधी – सरकार मित्र मंडळाच्या गणेशोत्सवाची सांगता उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात गणेश विसर्जन मिरवणुकीने…

17 hours ago

सरकार मित्र मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीला अलोट गर्दी ढोल-ताशांचा गजर भक्तिमय वातावरणात गणरायाला निरोप

करमाळा : प्रतिनिधी – सरकार मित्र मंडळाच्या गणेशोत्सवाची सांगता गणेश विसर्जन मिरवणुकीने उत्साहपूर्ण आणि भक्तिमय…

18 hours ago

शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावुन घेण्यासाठी वीजपुरवठा खंडित केल्यास तीव्र आंदोलन करणार: राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष भरत भाऊ आवताडे*

करमाळा : प्रतिनिधी – सीना-कोळगाव जलाशयातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याच्या उद्देशाने काही गावांतील शेतीपंपांचा वीजपुरवठा…

2 days ago

स्वर्गीय शिवा नाना कांबळे यांच्या स्मरणार्थ गणेश विसर्जन मिरवणूकीत माणुसकीचा प्रसाद अल्पोपहार व पाणी वाटप

करमाळा : प्रतिनिधी राशीन पेठ येथील स्वर्गीय शिवा (नाना) कांबळे यांच्या स्मरणार्थ गणेश विसर्जन मिरवणुकीत…

2 days ago