Categories: करमाळा

महायुती आदिनाथ बचाव पॅनेलच्या माध्यमातून संजयमामा शिंदे सक्षमपणे आदिनाथ कारखाना चालवणार हा सभासदांना विश्वास-महेश चिवटे


करमाळा प्रतिनिधी
माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी अडचणीतला कारखाना पुन्हा जोमाने सुरू करण्याचा सभासदांना शब्द देऊन आदिनाथ कारखान्याचे शिवधनुष्य उचलले आहे .यामुळे तालुक्यातील सर्व सभासदांनी गट पक्ष सोडून राजकारण बाजूला ठेवून
संजय मामा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती आदिनाथ बचाव पॅनलला विजयी करावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले आहे .
महायुती आदिनाथ बचाव पॅनलची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महेश चिवटे बोलत होते
यावेळी पुढे बोलताना चिवटे म्हणाले की ,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार
यांच्या मान्यतेनुसार महायुती आदिनाथ बचाव पॅनल ची निर्मिती झाली असून आदिनाथ कारखाना सक्षमपणे चालून ऊस उत्पादक शेतकरी कामगार वाहतूकदार व आदिनाथ वर अवलंबून असलेल्या सर्व घटकांना न्याय देण्यासाठी माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी या निवडणुकीत शड्डू ठोकला आहे.आर्थिक अडचणीत संकटात असलेला आदिनाथ कारखाना राज्य सरकार व केंद्र सरकारच्या सहकार्याशिवाय ऊर्जेत अवस्थेत येऊ शकत नाही यामुळे महायुतीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जात आहे .वेळप्रसंगी स्वतःच्या खिशातील पैसे टाकू मात्र आदिनाथ सक्षमपणे चालू करू
असा शब्द संजयमामा शिंदे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिला आहे.करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादकाचे हित डोळ्यापुढे ठेवून माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी घेतलेला निर्णय अभिमानास्पद असून ते कारखान्याला निश्चितच गतवैभव प्राप्त करून घेतली असा विश्वास महेश चिवटे यांनी व्यक्त केला आहे.

चौकट –
सभासदांनी संधी दिली तर आदिनाथला गतवैभव प्राप्त करून देऊ – संजयमामा शिंदे
आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मंदिर आहे
या माध्यमातून जवळपास 25 हजार कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. या तालुक्याने मला आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली त्याची उतराई म्हणून हा आदिनाथ कारखाना सक्षमपणे सुरू करून
आदिनाथ ला पुन्हा गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे.वेळप्रसंगी पडेल ती किंमत मोजू मात्र सभासदांनी टाकलेला विश्वास यशस्वी करून दाखवू असे पॅनल प्रमुख तथा माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी उमेदवार यादी जाहीर केल्यानंतर आपले मनोगत व्यक्त केले.

महायुती आदिनाथ बचाव पॅनलचे अधिकृत उमेदवार

जेऊर गट
चंद्रकांत सरडे, प्रशांत पाटील ,प्रमोद बदे.

सालसे गट
विलास जगदाळे,नवनाथ जगदाळे ,नागनाथ चिवटे

पोमलवाडी गट
दशरथ पाटील ,नितीनराजे भोसले ,बबन जाधव

केम गट
संजयमामा शिंदे ,सोमनाथ देशमुख,सोमनाथ रोकडे

रायगाव गट
अभिजीत पाटील ,आशिष गायकवाड ,विनय ननवरे

सहकारी संस्था – सुजित बागल.
अनुसूचित जाती जमाती – बाळकृष्ण सोनवणे
महिला राखीव – मंदाताई सरडे, शालन गुंडगिरे
इतर मागासवर्गीय – रोहिदास माळी
भटक्या जाती-जमाती – अनिल केकान .

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळ्यात श्री संत नामदेव शिंपी महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहास भक्तिमय प्रारंभ११ ऑगस्ट रोजी संजीवन समाधी सोहळा महाप्रसाद,

करमाळा, प्रतिनिधी : करमाळा येथील श्री संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने श्रीसंत नामदेव शिंपी महाराज…

1 day ago

स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी स्व. रुक्मिणी विठ्ठल आवताडे यांच्या २७ व्या पुण्यस्मरणानिमित विशाल महाराज खोले यांचा ‘आई-वडील हेच खरे दैवत’चा हृदयस्पर्शी संदेश

करमाळा प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य भरत (भाऊ) आवताडे यांच्या…

1 day ago

शाहुनगर पाणीप्रश्नाला मोठा दिलासा; नवीन चार इंची पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ उत्साहात नगरपरिषदेचा महत्त्वाकांक्षी उपक्रम

* करमाळा, प्रतिनिधी : करमाळा शहरातील शाहूनगर परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नाच्या निराकरणाच्या दिशेने…

1 day ago

श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन संवर्धनासाठी भाविकांचा वाढता प्रतिसाद; विकास चौकटे यांची ₹३,००१ देणगी

करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…

3 days ago

संजय गांधी निराधार योजनेची प्रकरने चार महिन्यापासून मंजूर झाली नाहीत तत्काळ मंजूर करा अन्यथा आंदोलन करू – राजाभाऊ कदम

करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…

3 days ago

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या इंग्रजी अभिव्यक्तीला जिल्हास्तरीय व्यासपीठ* *लोकशिक्षिका स्व. लीलाताई दिवेकर यांच्या स्मरणार्थ करमाळ्यात उद्या वक्तृत्व स्पर्धा

करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…

3 days ago