Categories: करमाळा

आमदार नारायण आबा पाटील यांचेसह महाआघाडीचचे २१ उमेदवार निवडणुक रिंगणात -सुनील तळेकर

करमाळा प्रतिनिधी आमदार नारायण आबा पाटील यांचेसह महाआघाडीचचे २१ उमेदवार निवडणुक रिंगणात उतरले असल्याची माहिती पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी दिली . आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून आजी माजी आमदारासह इतर काही जणांचे पॅनल जाहिर झाले आहेत. पाटील गटाच्या वतीने पॅनल बद्दल माहिती देताना तळेकर यांनी सांगितले की राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,जेष्ठ नेते माजी आमदार जयवंतराव जगताप , खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व आमदार नारायण आबा पाटील, सावंत बंधू यांच्या एकत्रीत विचारातुन या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने
निवडलेले उमेदवार पुढील प्रमाणे आहेत. जेऊर गटातुन १) श्रीमांत त्रिंबक चौधरी (उमरड), २) महादेव श्रीपती पोरे (कुगाव) ३) दत्तात्रय रामचंद्र गव्हाणे (पोपळज) तर सालसे गटातुन १) रविकिरण पोपट फुके (करंजे) २) दशरथ येदू हजारे (जवळा) ३) आबासाहेब उर्फ वसंत शंकर अंबारे (गौंडरे). तसेच पोमलवाडी गटातून १) किरण जगन्नाथ कवडे(कात्रज) २) नवनाथ मधूकर झोळ (वाशिंबे) ३) संतोष खाशेराव खाटमोडे पाटील तर केम गटातुन १) दत्तात्रय हरिश्चंद्र देशमुख (वांगी १) २) विजयसिंह जिजाबा नवले (कंदर) ३) महेंद्र दिनकर फाटील (बिटरगाव ) तसेच रावगाव गटातुन १) देवानंद गोपाळ बागल (मांगी) २) अडव्होकेट राहुल सुभाष सावंत (करमाळा) ३) डाॅ अमोल नानासाहेब घाडगे (तरटगाव) तसेच सोसायटी मतदार संघातुन डाॅ हरिदास तुळशीराम केवारे (आळजापुर) तर एस सी राखीव प्रवर्गातून  राजेंद्र उर्फ राजाभाऊ भीमा कदम (उमरड) तर महिला राखीव मतदार संघातून राधिका भीमराव तळेकर (वांगी ) व उर्मीला हनूमंंत सरडे (चिकलठाण) तसेच इतर मागासवर्ग मतदार संघातून दादासाहेब नामदेव पाटील (बिटरगाव ) यांना उमेदवारी देण्यात आली. तर आमदार नारायण आबा पाटील हे एन टी राखीव मतदार संघातून निवडणुकीत उतरले आहेत अशी माहिती प्रवक्ते सुनील तळेकर यांनी दिली.

saptahikpawanputra

Recent Posts

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

1 hour ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

11 hours ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

1 day ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

1 day ago

करमाळा पोलिसांचा दणका ट्रॅक्टर चोरीचा छडा; ३.७५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत वीट येथील शेतातून ट्रॅक्टर लंपास; तांत्रिक तपासातून दोघे ताब्यात

करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…

1 day ago