करमाळा प्रतिनिधी
सर्वसामान्य परिवारातील रुग्णांना आरोग्य सेवेत मदत करणे ही रुग्ण सेवा बरोबरच खऱ्या अर्थाने ईश्वर सेवा असून खऱ्या अर्थाने मंगेश चिवटे ईश्वर सेवा करत आहेत असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांनी व्यक्त केले.व्यासपीठावर नामदार पंकजाताई मुंडे उपस्थित होत्या.लोकाशा प्रतिष्ठानच्या वतीने
रुग्णसेवक हा पुरस्कार नामदार पवार व नामदार मुंडे यांच्या हस्ते चिवटे यांना देण्यात आला.लोकाशा प्रतिष्ठानचे चेअरमन
विजयराज बंब यांनी या सत्कार कार्यक्रमाच्या आयोजित केली होतेयावेळी पुरस्काराची मिळालेली एक लाख रुपये रक्कम कॅन्सरग्रस्त रुग्णासाठी देणार असल्याचे मंगेश चिवटे यांनी जाहीर केले.यावेळी बोलताना नामदार अजितदादा म्हणाले की
करमाळ्यासारखे ग्रामीण भागातून आलेला करून इलेक्ट्रॉनिक मीडियातील आपले काम सोडून रुग्णसेवेला वाहून घेतो व एक रुग्णसेवा चळवळ यशस्वी करून दाखवतो यामुळेच ते आज संपूर्ण महाराष्ट्रात सर्व दूर परिचित झाले आहेत
महाराष्ट्रातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी वेगळ्यावेगळ्या उपाययोजना करणे गरजेचे असून तळागाळातील सर्वसामान्यांना मोफत रुग्णसेवा उपलब्ध करून देण्यासाठी चिवटे यांनी आगामी काळात प्रयत्न करावे असे आव्हान केले.नामदार पंकजाताई मुंडे म्हणाले की गेली बारा वर्षापासून मी मंगेश चिवटे ओळखत असून त्यांची काम करण्याची पद्धत व संवेदनशीलता मी जवळून अनुभवली आहे.
———-
यावेळी प्रेक्षकात वसलेल्या मंगेश चिवटे यांचे वडील नरसिंह चिवटे व आई मंदाकिनी चिवटे यांना नामदार पवार व नामदार मुंडे यांनी व्यासपीठावर बोलून त्यांचाही सत्कार केला
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून अडीच वर्षाच्या काळात स400 कोटी रुपयांची आर्थिक मदत सर्वसामान्य रुग्णांना केले असूनआगामी काळात एका अहवालानुसार कॅन्सर ही मोठी समस्या देशापुढे उभा राहणार आहे जास्तीत जास्त कॅन्सर रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणावर उपचार यंत्रणा उभा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मंगेश चिवटे आपले भाषणात सांगितले.
करमाळा प्रतिनिधी समाजकारणातून राजकारणात यशस्वी वाटचाल करणाऱ्या सावंत गटाचे करमाळा तालुक्याच्या विकासासाठी योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे…
करमाळा प्रतिनिधी आमदार नारायण आबा पाटील यांनी नामदार प्रताप सरनाईक यांचेकडे करमाळा आगारासाठी एकुण वीस…
करमाळा प्रतिनिधी श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सोसायटी मतदारसंघातून डॉक्टर हरिदास केवारे यांची सहाव्या…
करमाळा प्रतिनिधी प्रहार जनशक्ती पक्ष करमाळा,यशश्री हॉस्पिटल कंदर व आरोग्यवर्धीनी केंद्र व ग्रामपंचायत निंभोरे यांच्या…
करमाळा प्रतिनिधी नूतन पोलीस निरीक्षक रंणजीत माने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलीस ठाणेची दमदार कामगिरी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शंभर दिवसाच्या विकास आराखडा अंतर्गत मुख्यमंत्री कृषी उत्पन्न…