माजी उपसभापती संजय जाधव, भाऊसाहेब फुके, डॉ समाधान कोळेकर, आदिसह सर्व उमेदवार उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्या भाषणातून आदिनाथ कारखान्याच्या इतिहासास उजळणी दिली. कारखान्याच्या चालू आर्थिक स्थितीबद्दल सभासदांना माहिती देऊन आगामी काळात आपण या कारखान्याच्या शासनस्तरावर असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी अविरत प्रयत्न करणार असल्याचे सांगुन या पॅनेलमधील सर्व उमेवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. तर माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी आल्या भाषणातून विरोधकांचा खास आपल्या शैलीत समाचार घेतला. आदिनाथ कारखान्याच्या या निवडणुकीत नव्या उमेदीचे उमेदवार या पॅनलमधून निवडणुक रिंगणात उतरले असुन या युवाशक्तीच्या उर्जेचा उपयोग आदिनाथला उर्जित अवस्थेत आणण्यासाठी निश्चित होणार असल्याची खात्री त्यांनी बोलून दाखवली. तसेच देशभक्त स्वातंत्र्य सैनिक माजी आमदार नामदेवराव जगताप व सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील हे नेहणीच जिल्हा विकासाच्या मुद्यावर मतभेद सोडुन एकत्र येत असल्याची आठवण करुन देऊन तालूक्यातील गावोगाव आता गटतट बाजुला सारुन आदिनाथ वाचवण्यासाठी मतदारांनी या पॅनलच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केले. तर विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांनी या कारखान्याच्या उभारणीसाठी कर्मयोगी गोविंद बापु पाटील यांनी खुप मोठा त्याग केला असुन हा कारखाना आमच्यासाठी कुटुंबातील एका घटका समान असल्याचे सांगितले. तसेच आदिनाथ साठी आपण आमदार पदाची ताकद यामागे लावणार असून वेळप्रसंगी कोणतीही राजकीय ताकद पणाला लावण्याची आपली तयारी असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. प्रास्ताविक आमदार पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केले. तर यावेळी देवानंद बागल व सुनील सावंत यांनी विचार मांडले. सुत्रसंचलन डॉ समाधान कोळेकर यांनी केले तर आभार डॉ अमोल घाडगे व रविकिरण फुके यांनी मानले. विधीज्ञ राहुल सावंत यांनी मान्यवरांचे स्वागत केले. या सभेस मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…
* करमाळा प्रतिनिधी “भारतीय डाक विभागाच्या विविध बचत, विमा आणि आर्थिक सुरक्षा योजना ग्रामीण भागातील…
करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…
करगाळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षा…