Categories: Uncategorized

करमाळा येथे गणेश चिवटे यांच्या नेतृत्वात भाजपाचा ४५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या नेतृत्वात भाजपचा ४५ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात गुरुप्रसाद मंगल कार्यालयात पार पडला. यावेळी प्रथमतः दीपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू श्रीराम, भारत माता यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले व भारतीय जनता पक्षाच्या ध्वजाचे पुजन सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले,
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना गणेश चिवटे म्हणाले की भाजपाच्या कार्यकर्त्यांनी गत काळात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये पक्षाचे काम केले आहे , दोन खासदारपासून सुरवात केलेल्या भाजपने देशात स्वबळावर सत्ता आणली आहे, स्व. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यासह हजारो नेते व लाखो कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व आ. रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वात राज्यात दीड कोटी सभासद नोंदणी करण्यात आली आहे, आज भाजपा हा देशातील नव्हे तर जगातील सर्वात मोठा पक्ष आहे.आपण भाजपमध्ये सक्रिय सभासद आहोत ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे,
यावेळी शहराध्यक्ष जगदीशजी अग्रवाल व जेष्ठ नेते भगवान गिरी गोसावी यांनी भारतीय जनता पार्टीचा सुरुवातीपासून ते आजपर्यंतचा कार्यकाळ सर्व उपस्थित कार्यकर्त्यांना आपल्या मनोगतातून सांगितला,
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस नितीन झिंजाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे यांनी मानले ,
यावेळी सरचिटणीस काकासाहेब सरडे,युवा मोर्चा ता.अध्यक्ष अमोल पवार, तालुका उपाध्यक्ष बंडू शिंदे,ओबोसी जिल्हा उपाध्यक्ष अमोल जरांडे, मोहन शिंदे, डॉ अभिजीत मुरूमकर, विष्णू रणदिवे , संतोष कुलकर्णी, सोमनाथ घाडगे, लक्ष्मण शेंडगे, राजु सय्यद, प्रविण बिनवडे, प्रदिप देवी, बाळासाहेब कुंभार, नवनाथ नागरगोजे, प्रकाश ननवरे, भैय्याराज गोसावी, अशोक ढेरे, हर्षद गाडे, महिला आघाडीच्या संगीता नष्टे, चंपावती कांबळे, ढोके मॅडम, किरण बागल, शिवाजी बोराटे, उमेश मगर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,

saptahikpawanputra

Recent Posts

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

9 hours ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

22 hours ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

1 day ago

करमाळा पोलिसांचा दणका ट्रॅक्टर चोरीचा छडा; ३.७५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत वीट येथील शेतातून ट्रॅक्टर लंपास; तांत्रिक तपासातून दोघे ताब्यात

करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…

1 day ago

श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

  करगाळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षा…

3 days ago