केतुर प्रतिनिधी सचिन खराडे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री उत्तरेश्वर विद्यार्थी वस्तीगृह केम येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त वृक्षारोपण व ध्वजारोहण साजरे श्री उत्तरेश्वर विद्यार्थी वस्तीग्रह केम येथे स्वातंत्र्य दिनांनिमित्त वस्तीग्रहाचे ध्वजारोहन स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे माजी आजीव सेवक श्री ज्ञानेश्वर पाटील, श्री. दत्तात्रय भोसले सर व श्री पांडुरंग देवकर सर यांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर वस्तीग्रहामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सरपंच आकाश भोसले, शालेय समितीचे अध्यक्ष मोहन दोंड, मुख्याध्यापक रामेश्वर गवळी सर, प्रा मच्छिंद्र नागरे , प्रा गोपीनाथ शिंदे, प्रा. मालोजी पवार, प्रा संतोष साळुंखे, श्री. अमोल तळेकर, अधीक्षक सागर महानवर श्री कोंडलकर सर, श्री भुजंग तळेकर सर श्री दिलीप तळेकर सर,श्री मुलानी सर, संजय नवले तसेच शाळा व महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. सर्व कार्यक्रम सोशल डिस्टंसिंग पाळून पूर्ण करण्यात आला .सूत्रसंचालन सौ प्रीती कुरडे यांनी केले.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…