Categories: करमाळा

प्रहारचे 11एप्रिलला आमदारांच्या घरासमोर टेंभा आंदोलन -सोमनाथ जाधव

करमाळा प्रतिनिधी प्रहारचे 11एप्रिलला आमदारांच्या घरासमोर टेंभा आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती प्रहारचे तालुका उपप्रमुख सोमनाथ जाधव यांनी दिली आहे.शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, दिव्यांगांची पगारवाढ या न्याय हक्काच्या मागण्यांकरिता प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा.आ.बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशान्वये शांततेच्या मार्गाने 11एप्रिल रोजी रात्री 12वाजता जिल्ह्यातील सर्व स्थानिक आमदारांच्या घरासमोर टेंभा आंदोलन करण्यात येणार आहे . या आंदोलनाचे निवेदन तहसीलदार करमाळा स्टेशनचे पोलिस निरीक्षक विनोद घुगे साहेब यांना देण्यात आले आहे. यावेळी   सोमनाथ जाधव प्रहार शेतकरी संघटना तालुका उपप्रमुख करमाळा, स्वातीताई गोरे प्रहार महिला तालुकाध्यक्ष करमाळा,सागर पवार तालुका संपर्कप्रमुख करमाळा,
युनूस पठाण प्रहार युवक जिल्हा उपाध्यक्ष,नामदेव पालवे तालुका संघटक करमाळा,संतोष कुंभार दिव्यांग तालुकाध्यक्ष करमाळा व इतर पदाधिकारी कार्यकर्ते निवेदन देताना उपस्थित होते .तरी या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन तालुका उपप्रमुख सोमनाथ जाधव यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

14 hours ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

16 hours ago

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

2 days ago