करमाळा अर्बन बँकेचे निर्बंध उठले इच्छुक उमेदवारांना डिपॉझिट व शेअर्सच्या रकमा भरता येणार- प्रा. रामदास झोळ सर

करमाळा प्रतिनिधी दि करमाळा अर्बन को ऑप बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2025 आहे. करमाळा अर्बन बँकेवर रिझर्व बँक ऑफ इंडियाचे निर्बंध आहेत. त्यामुळे अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांना शेअर्सच्या रकमा आणि डिपॉझिटच्या रकमा बँकेत भरता येत नव्हत्या. ही गोष्ट समजताच प्रा. रामदास झोळ सर यांनी तातडीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना संपर्क करून पत्र व्यवहार केला आणि निर्बंध उठवण्यास किंवा त्यामध्ये शिथिलता आणण्यास सांगितले. या गोष्टीची तातडीने वरिष्ठ पातळीवर दखल घेऊन अर्बन बँकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना आता बँकेमध्ये शेअरच्या रकमा आणि डिपॉझिटच्या रकमा भरता येणार आहेत. हे अडचणीचे निर्बंध आता उठवले गेले आहेत. इच्छुक उमेदवारांनी व प्रा. रामदास झोळ सर यांनी बँकेच्या सर्व अधिकाऱ्यांचे निवडणूक निर्णय अधिकारी,डी डी आर ऑफिस,सहकार निबंधक यांचे आभार मानले. उद्या बँक बंद असून परवा बँकेत गर्दी होऊ शकते यामुळे पैसे भरण्यासाठी वेगळा कक्ष चालू करावा असे झोळ सर यांनी सांगितले आहे. तसेच जास्तीत जास्त सभासदांनी उमेदवारी अर्ज दाखल करावेत असे आवाहन देखील प्राध्यापक झोळ सर यांनी केले आहे. मागील तीन वर्षापासून बँकेवर निर्बंध असल्याकारणाने गोरगरीब नागरिकांचे ठेवी अडकून पडलेल्या आहेत काही ठेवीदारांचे पैसे न मिळाल्याने दवाखान्याचे बिल भरताना आल्यामुळे मृत्यूला सामोरे जावे लागलेले आहे. आता निर्बंध उठल्याने सभासदांना दिलासा मिळाला आहे*

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा येथील सेवानिवृत्त नगरपालिका कर्मचारी मोहम्मद खान यांचे निधन

करमाळा प्रतिनिधी  करमाळा येथील सेवानिवृत्त नगरपालिका कर्मचारी हाजी मोहम्मद महेबूब खान पठाण उर्फ खान चाचा…

2 hours ago

*स्व.काकासाहेब थोबडे चषकाचे उपविजेते होत करमाळा वकील संघाने केली दमदार कामगिरी

करमाळा प्रतिनिधी- सोलापुर येथे चालु असलेल्या स्व. काकासाहेब थोबडे चषकामधे करमाळा वकील संघाने दमदार कामगिरी…

24 hours ago

प्राध्यापक डॉ. शरद जाधव यांना संगणकशास्त्राची पीएचडी पदवी

  करमाळा प्रतिनिधी  भालेवाडी (ता. करमाळा) येथील रहिवासी तथा महात्मा गांधी ज्युनिअर कॉलेज, करमाळा येथे…

1 day ago

जिल्हा दिव्यांग अधिकारी दक्षिण सोलापूरचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांची मुकबधीर शाळेला भेट दिव्यांग विद्यार्थ्यांसमवेत अधिकाऱ्यांचे जेवण

करमाळा प्रतिनिधी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी पदाचा नुकताच पदभार स्वीकारलेले दक्षिण सोलापूरचे गटविकास अधिकारी मनोज…

1 day ago

एन.सी.सी. हे देशसेवा व करिअर घडवण्याचे माध्यम’ -विलासरावजी घुमरे

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय मध्ये एनसीसी विभागातर्फे आर्मी, वायुसेना, पोलीस भरती इत्यादी…

2 days ago