करमाळा प्रतिनिधी
. आदिनाथ सहकारी साखर कारखाना २००० साली तत्कालीन आमदार,माजी मंत्री स्व.दिगंबरराव बागल यांनी पूर्णपणे कर्जमुक्त केलेला आदिनाथ हा कोणाच्या करणीमुळे पुन्हा गर्तेत गेला हे जगजाहीर आहे आणि सद्यस्थितीत हा कारखाना पुन्हा सुरळीत करण्याची कुवत फक्त माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडेच आहे ! असे ठोस प्रतिपादन महायुती आदिनाथ बचाव पॅनलचे उमेदवार,आदिनाथचे माजी व्हा. चेअरमन चंद्रकांत सरडे यांनी साडे येथील महायुती आदिनाथ बचाव पॅनलच्या जाहीर प्रचारसभेत बोलताना केले.
यावेळी पुढे बोलताना सरडे म्हणाले की,२००० साली कर्जमुक्त झालेला आदिनाथ हा सभासदांच्या दुर्दैवाने २००१ च्या निवडणुकीत माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेल्या माजी आमदार रावसाहेब पाटील,गोविंदबापू पाटील,बाळासाहेब खताळ आदी मंडळींच्या ताब्यात गेला. मात्र या पॅनलचे नेते असलेल्या जगताप यांचा सहकारी संस्था मतदारसंघातून झरे येथील ज्येष्ठ नेते,माजी उपसभापती विलासराव पाटील यांनी दारुण पराभव केला ,मात्र असे झाले तरी जगताप हे नेते असल्याने त्यांच्या आदेशानुसारच कारखान्याचे कामकाज सुरू होते.सुरुवातीला रावसाहेब पाटील यांना दोन वर्षे चेअरमन करण्यात आले त्यावेळी कारखाना सुरळीत चालला,त्यानंतर पुढील दोन वर्षे गोविंदबापू पाटलांना चेअरमन करण्यात आलं त्यावेळच्या हंगामात
आदिनाथला ऊस घालू नका हा जयवंतरावांचा मेसेज हस्ते-परहस्ते व्हायरल झाल्याने त्यावेळी अवघे ५५ हजार टन गाळप झालं आणि तिथपासून आदिनाथचे बुरे दिन सुरू झाले आणि पुढील काळात जी वाताहात झाली त्याचे संपूर्ण पाप हे जयवंतराव आणि नारायण पाटील यांचं आहे. कारण २००१ ते २००६ या दरम्यान आदिनाथवर सत्ता असल्याचा सर्वाधिक गैरफायदा नारायण पाटलांनी घेतला हे लक्षात घेऊन आदिनाथच्या हितासाठी या निवडणुकीमध्ये आमदार नारायण पाटील यांच्या पॅनलला पराभूत करा असे आवाहन यावेळी सरडे यांनी केले.यावेळी समाधान दोंड,राजाभाऊ बाबर,निंभोरेचे सरपंच रवींद्र वळेकर,मकाईचे माजी संचालक विवेक येवले, विलासकाका राऊत,भाजपचे गणेश चिवटे आदींची भाषणे झाली.
चौकट –
दहिगाव योजनेची वाट कुणी लावली ? आदिनाथचे माजी संचालक विलासकाका राऊत तालुक्यातील पूर्व भागाच्या व्यथा
अभ्यासपूर्वक मांडताना चालू आमदार नारायणपाटील यांनी संजयमामानी गेली पाच वर्षे सुरळीत चालवलेली दहिगाव योजना आमदार झाल्यानंतर मामांनी सुरू केलेली बंद पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा ही योजना बंद पाडली,या योजनेसाठी सरपडोह शिवारातील या योजनेचे उघड्यावर पडलेले लाखोंचे पाईप कोणी जाळले ? असा मुद्दा उपस्थित करून पूर्व भागासाठी आदिनाथ सुरू होणे गरजेचे असल्याचे सांगून ही क्षमता केवळ मामांकडेच असल्याचे प्रतिपादन केले आहे.
करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…
करमाळा प्रतिनिधी भाजप पक्षाच्या कार्यक्रमा निमीत्त करमाळा दौऱ्यावर आले असता मा . आ . जयवंतराव…
* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…