Categories: करमाळा

पोटेगाव बंधाऱ्याचे काम अजून का सुरू नाही ? महायुतीचे उमेदवार विनय ननवरे यांचा आ.नारायण पाटील यांना सवाल…


करमाळा प्रतिनिधी
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या रणधुमाळीमध्ये विकास कामांचा मुद्दा अग्रक्रमाने मांडला जात आहे.2019 ते 24 या कार्यकाळामध्ये माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून 3490 कोटीची विकास कामे मतदार संघामध्ये मंजूर केलेली होती त्यातील बरीचशी कामे त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर 2025 मध्ये सुरू झाली.परंतु या विकास कामांमध्ये अडकाटी घालण्याचा प्रयत्न विद्यमान आमदारांकडून सुरू असून पोटेगाव बंधाऱ्याचे काम अजून का सुरू नाही असा सवाल महायुती आदिनाथ बचाव पॅनलचे उमेदवार तथा बोरगाव चे सरपंच विनय ननवरे यांनी आमदार नारायण पाटील यांना विचारला आहे.
याविषयी अधिक माहिती देताना ननवरे म्हणाले की,करमाळा तालुक्यातील सीना नदीवरील अत्यंत महत्त्वाचा असलेल्या पोटेगावच्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ४ कोटी ८ लाख निधीस मान्यता मिळून बंधाऱ्याचे भूमीपूजन आ.संजयमामा शिंदे यांच्या हस्ते झाले होते.त्यानंतर सत्तापालट झाल्यामुळे या कामाला खीळ बसली .या बंधार्‍याचा फायदा पोटेगाव, बाळेवाडी पोथरे ,बिटरगाव श्री, तरटगाव ,निलज या ६ गावांना होणार असून एकूण ८१५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.पोटेगाव या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे काम १९९० च्या दरम्यान पूर्ण झाले.तेंव्हापासून हा बंधारा दुरूस्ती च्या प्रतिक्षेत होता. 35 वर्षाच्या कालावधीत अनेक आमदार खासदार होऊन गेले परंतु कुणालाही तो प्रश्न सोडवता आला नाही.असा जटिल प्रश्न संजयमामा शिंदे यांनी सोडवला, परंतु केवळ राजकीय कुरघोडी करण्याच्या हेतूने हे काम नारायण पाटील यांनी आडवून ठेवले आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी या नात्याने तुम्हाला मतदार संघाचे भले करता येत नसेल तरी किमान वाईट तरी करू नका अशी संतप्त प्रतिक्रिया संजीवनी पॅनलच्या प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.
आ.नारायण पाटील यांनी रोखून धरलेले सदर बंधाऱ्याचे काम तात्काळ सुरू न झाल्यास आपण लवकरच मोठे जनआंदोलन उभा करू असा इशारा विनय ननवरे यांनी दिला आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबतर्फे गणेशोत्सवानिमित्त १६ सप्टेंबरला मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबिराचे आयोजन – प्रशांत ढाळे

  करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…

4 hours ago

२५ सप्टेंबरपासून करमाळ्यात खत विक्रीला ‘FFS’ प्रणाली गुणनियंत्रण कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांचा विक्रेत्यांना इशारा लिंकिंग, काळाबाजार व चढ्या दराने विक्री केल्यास कडक कारवाई

करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…

20 hours ago

करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न; शासनस्तरावरील नियम-अटी व विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा

करमाळा  प्रतिनिधी करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी पोथरे…

1 day ago

राज्य फेंसिंगच्या रणांगणात कुचन प्रशालेचे तीन शिलेदार! ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धेत अक्षय पिट्टा, श्वेता विडप व गंधम तुलसी यांचा सहभाग

करमाळा प्रतिनिधी: अमरावती येथे सुरू असलेल्या ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये…

2 days ago

करमाळा तालुक्यात शेतीपंपांची वीज कपात म्हणजे शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा प्रकार शंभूराजे जयवंतराव जगताप यांचा इशारा ​

​करमाळा प्रतिनिधी: गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेतकरी वर्ग सातत्याने अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत आहे.…

2 days ago