Categories: Uncategorized

आदिनाथ उर्जित अवस्थेत आणण्यासाठी सुध्दा पश्चिम भाग आमच्या पॅनलला मतांची ताकद देईल-आमदार नारायण आबा पाटील

करमाळा प्रतिनिधी पश्चिम भागाने मला आमदार म्हणुन काम करताना भक्कम साथ दिली, आदिनाथ उर्जित अवस्थेत आणण्यासाठी सुध्दा पश्चिम भाग आमच्या पॅनलला मतांची ताकद देईल असा विश्वास आमदार नारायण आबा पाटील यांनी बोलून दाखवला. केतूर येथील सभेत ते बोलत होते. श्री आदिनाथ कारखाना संजिवनी पॅनल’ची प्रचार सभा केतूर येथे पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती बापुसाहेब पाटील होते तर यावेळी व्यासपीठावर सभापती अतुलभाऊ पाटील, संपत खाटमोडे,हनुमंत नवले
सुभाष जरीडे, रामनाना कोकणे, नवनाथबापू झोळ, संतोष पाटील, किरण कवडे, महादेव पोरे,
कानतोडे सर, विलास कोकणे, बंडू पाटील, शहाजी पाटील, रामहरी धाडे, निवास उगले सुहास निसळ, दादासाहेब कोकरे, चंद्रकांत पाटील, सुभाष राऊतमहादेव नगरे, नानासाहेब पवार सर , भानुदास बाबर,आबा पाटील, राजेंद्र भोसले सरपंच राजूरी, बाळासाहेब जरांडे, देवा नवले, महेश महामुनी, चिंतामणी कानतोडे, काका कोकणे, भिमराव येडे, पवन झांजुर्णे, दादा कानतोडे, राजाभाऊ झोळ, गणपत पाटील, राजू ठोंबरे, राजेंद्र खटके, आप्पासाहेब कानतोडे, सुभाष खाटमोडे, रामभाऊ मिंड, सुजित पाटील,
दत्ता महानवर, विनोद बाबर, सर्वनाथ पांढरे,
पंडीत माने, आमदार नारायण आबा पाटील,
राहूल गोडगे, सोशल मीडिया तालूकाप्रमुख संजय फडतरे उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत ग्रामपंचायत सदस्य सुजीत पाटील यांनी केले. यावेळी बोलताना आमदार नारायण आबा पाटील म्हणाले की या भागातील शेतकऱ्यांना पुरक अशा वीज, पाणी व‌दळणवळण सुविधा मिळवून‌ देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करुन‌ या समस्या सोडवल्या. यामुळे माझी काम करण्याची क्षमता व चिकाटी या भागातील शेतकऱ्यांना ठाऊक आहे. आदिनाथ कारखाना ताब्यात दिल्यास हा कारखाना काही करुन मी सुस्थितीत आणेल, भले यासाठी मला कोणतीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी चालेल असे ठामपणे आमदार नारायण आबा पाटील यांनी शेवटी सांगितले. सुत्रसंचलन आबासाहेब येडे यांनी केले.
प्रास्ताविक आमदार नारायण आबा पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केले तर आभार संतोष पाटील यांनी मानले.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

3 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

4 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago