आदिनाथ सहकारी साखर कारखाना यशस्वीपणे चालवण्यासाठी प्रा. रामदास झोळ सर ‌ यांच्या ‌ शेतकरी विकास पॅनलला विजयी करा-मा.खा.राजु शेट्टी

करमाळा प्रतिनिधी आदिनाथ सहकारी साखर कारखाना चालवण्यासाठी प्राध्यापक रामदास झोळ सर ‌ यांच्या ‌ शेतकरी विकास पॅनलला विजयी करा असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. .प्रस्थापित पुढारी नवनिर्माण करणाऱ्या नव्या लोकांना येण्यास विरोध करत असल्यामुळे सध्याच्या राजकीय परिस्थितीत सहकारी साखर कारखान्याची अवस्था बिकट झाली असल्याचे त्यांनी सांगितले . आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला दत्तकाला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पॅनलचे प्रमुख प्राध्यापक रामदास झोळ सर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, उपाध्यक्ष रवींद्र गोडगे, तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके उपाध्यक्ष सुहास काळे पाटील, बापूराव गायकवाड उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्रामध्ये एकूण 200 सहकारी साखर कारखाने होते त्यापैकी जवळजवळ शंभर कारखाने खाजगी झाले आहेत म्हणजे प्रस्थापित पुढाऱ्यांनी आपल्या बगलबच्चांना निवडणूक लढवायला लावून ते कारखाने चालवायला घेऊन विकत घेतले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र महाराष्ट्र  राज्यातील सहकारी साखर कारखानदारी मोडकळी आली असून सर्वसामान्य शेतकरी ऊसतोड कामगार यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने सहकार टिकवायचा असेल आणि साखर कारखानदारी वाचवायची असेल तर नव्या पर्यायाचा विचार करून आपल्यासाठी लढणारा आपला स्वाभिमान जपणारा   नेताच खऱ्या अर्थाने कारखाना वाचवु शकतो. त्यामुळे प्राध्यापक रामदास झोळ सर हे खऱ्या अर्थाने सर्व सामान्य शेतकऱ्याची न्याय देणारे खंबीर नेतृत्व असून त्यांच्याकडे सहकारी साखर कारखाना चालवण्यासाठी योग्य दृष्टिकोन व नियोजन नियोजन आहे.शेतकरी सभासद यांच्या पाठबळावर त्यांचा विजय निश्चित आहे.त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने त्यांना पाठिंबा दिला असून आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये प्राध्यापक रामदास झोळ यांच्या नेतृत्वाखाली सर्व पॅनलला विजयी करावे त्यांना आपण विजयी केल्यास आदिनाथ कारखान्याला नक्कीच गतवैभव मिळवून देऊन शेतकरी ऊसतोड कामगार कर्मचारी यांचे कल्याण करणार असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष  मा.खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

13 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

17 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

18 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago