Categories: Uncategorized

मतदार कारखाना वाचणाऱ्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील-आमदार नारायण आबा पाटील

करमाळा प्रतिनिधी आदिनाथ कारखान्याच्या अनेक निवडणुका झाल्या परंतु ही निवडणुक कारखान्याच्या अस्तित्वाची असल्याने सभासदांवर सुध्दा एक जबाबदारी आहे असे सांगुन मतदार कारखाना विकणाऱ्यापेक्षा कारखाना वाचणाऱ्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील असा ठाम विश्वास आमदार नारायण आबा पाटील यांनी व्यक्त केला. कविटगाव येथील सभेत ते बोलत होते. श्री आदिनाथ कारखाना संजिवनी पॅनल’ची प्रचार सभा कविटगाव येथे पार पडली. यावेळी
सभापती अतुलभाउ पाटील, केमचे माजी सरपंच अजितदादा तळेकर, कंदरचे सरपंच मौलाभाई मुलाणी, माजी सभापती शेखर गाडे , नितिनदादा हिवरे, नानासाहेब गोडगे, दादासाहेब मंगवडे, अखलाख जहागीरदार, संभाजी कांबळे महादेव दडस, संजय टकले बिभिषण सोनवणे, नारायण पांडव, संतोष कोपनर (माजी उपसरपंच), भैरू हराळे, कदम भाऊसाहेब, शिवाजी सरडे, विठ्ठल चौधरी, ज्योतीराम भोसले, आप्पा चौधरी, भाऊसाहेब जगदाळे, भिवा जाधव, आणा जाधव, विष्णू पाटील, यशवंत पांडव, पांडूरंग शिंदे, रामेश्वर चौधरी, उमेदवार महेंद्र पाटील, विजयसिंह नवले, दादासाहेब पाटील, रामेश्वर तळेकर, दत्तात्रय देशमुख आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार नारायण आबा पाटील म्हणाले की आदिनाथ कारखाना हा या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विकासाचा केंद्रबिंदू ठरेल या उद्देशाने कर्मयोगी गोविंद बापु पाटील यांनी या कारखान्याची उभारणी केली. आज हा उद्देश सफल करण्यासाठी आम्ही निवडणुकीत उतरलो आहोत. भविष्यात कारखाना उर्जित अवस्थेत आणुन या ठिकाणी बायप्राॅडक्ट तयार करुन  ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला ऊस दर‌ देण्यास आम्ही वचनबद्ध असल्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले. प्रास्ताविक आमदार नारायण आबा पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केले तर आभार शिवाजी सरडे यांनी मानले.

saptahikpawanputra

Recent Posts

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

7 hours ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

20 hours ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

23 hours ago

करमाळा पोलिसांचा दणका ट्रॅक्टर चोरीचा छडा; ३.७५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत वीट येथील शेतातून ट्रॅक्टर लंपास; तांत्रिक तपासातून दोघे ताब्यात

करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…

1 day ago

श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

  करगाळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षा…

3 days ago