Categories: Uncategorized

चिखलठाण येथे धडाडणार राम सातपुते यांची तोफ आदिनाथ निवडणुकीच्या निमित्ताने आज प्रचार सभा…


करमाळा प्रतिनिधी
आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुकीनिमित्त प्रचार आता शिगेला पोहोचला असून प्रचारासाठी महायुती व महाविकास आघाडी कडून स्टार प्रचारक निवडणूक रिंगणामध्ये उतरविले जात आहेत. महायुती आदिनाथ बचाव पॅनलच्या आज चिखलठाण नं.१ येथे सायंकाळी ७.०० वाजता होणाऱ्या प्रचार सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे निकटवर्तीय माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रामजी सातपुते हे आवर्जून उपस्थित राहणार असून अकलूजकरांवरती ते कोणती तोफ डागणार याची उत्सुकता करमाळा तालुक्यातील सभासदांना आता लागलेली आहे.
आदिनाथच्या प्रचारामध्ये महायुती आदिनाथ बचाव पॅनलने आघाडी घेतली असून आता शेवटच्या टप्प्यात निर्णायक अवस्थेमध्ये स्टार प्रचारक म्हणून राम सातपुते आज चिखलठाण एक येथे येणार आहेत.या प्रचार सभेसाठी माजी आमदार संजयमामा शिंदे हे प्रमुख उपस्थितीत असणार आहेत. त्यांच्याबरोबरच बारामती ऍग्रो चे व्हॉइस चेअरमन सुभाष गुळवे तसेच भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे ,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे हे उपस्थित राहणार आहेत. सदर सभेसाठी मोठ्या संख्येने चिखलठाण नंबर एक येथे उपस्थित रहावे असे आवाहन जेऊर ऊस उत्पादक गटाचे उमेदवार चंद्रकांत काका सरडे यांनी केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

समाजकारणातून राजकारणात यशस्वी वाटचाल करणाऱ्या सावंत कुटुंबाचे करमाळा तालुक्याच्या विकासासाठी महत्वपुर्ण योगदान -आमदार नारायण आबा पाटील

करमाळा प्रतिनिधी समाजकारणातून राजकारणात यशस्वी वाटचाल करणाऱ्या सावंत गटाचे करमाळा तालुक्याच्या विकासासाठी योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे…

19 hours ago

आमदार नारायण आबा पाटील यांच्या प्रयत्नातून आता आणखी पाच एस टी बस करमाळा आगारात दाखल होणार

करमाळा प्रतिनिधी आमदार नारायण आबा पाटील यांनी नामदार प्रताप सरनाईक यांचेकडे करमाळा आगारासाठी एकुण वीस…

1 day ago

श्री आदिनाथ साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अथवा व्हाईस चेअरमनपदी जेष्ठ संचालक डॉ. हरिदास केवारे यांची निवड करण्याची मागणी

करमाळा प्रतिनिधी श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सोसायटी मतदारसंघातून डॉक्टर हरिदास केवारे यांची सहाव्या…

2 days ago

प्रहारचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या विचाराने प्रेरित होऊन निंभोरेत महिला आरोग्य शिबीर संपन्न

करमाळा प्रतिनिधी प्रहार जनशक्ती पक्ष करमाळा,यशश्री हॉस्पिटल कंदर व आरोग्यवर्धीनी केंद्र व ग्रामपंचायत निंभोरे यांच्या…

2 days ago

नूतन पोलीस निरीक्षक रणजीत माने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलीस ठाणेची दमदार कामगिरी सुमारे २ लाख ५८ हजार २५० रुपये किंमतीचा १० किलो गांजा जप्त

करमाळा प्रतिनिधी नूतन पोलीस निरीक्षक रंणजीत माने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलीस ठाणेची दमदार कामगिरी…

3 days ago

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्वच्छता अभियानाचा शुभारंभ

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शंभर दिवसाच्या विकास आराखडा अंतर्गत मुख्यमंत्री कृषी उत्पन्न…

3 days ago