Categories: Uncategorized

आदिनाथ”च्या सभासदांनो डोळसपणे निर्णय घ्या… माजी.आ.संजयमामा शिंदे यांचे सभासदांना आवाहन.


करमाळा प्रतिनिधी
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या रणधुमाळीत प्रचारादरम्यान दोन्ही गटांकडून दररोज एकमेकांवरती नवनवीन आरोप प्रत्यारोप केले जात आहेत.यामुळे सभासद शेतकरी हे मात्र संभ्रमित अवस्थेत आहेत.नेमका विश्वास कोणावर ठेवायचा असा गोंधळ निर्माण झालेल्या शेतकऱ्यांना आवाहन करताना माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी सभासदांनों डोळसपणे निर्णय घ्या व कारखाना चालू करण्याची कुवत व क्षमता कोणामध्ये आहे हे ओळखा.आपले अनमोल मत कारखान्याला उर्जित अवस्था प्राप्त करून देईल असे सांगतानाच आदिनाथच्या निवडणुकी पाठीमागे मोहिते पाटलांचे मोठे अर्थकारण व राजकारण असल्याची टीका शिंदे यांनी केली.
याविषयी बोलताना ते म्हणाले की,
विठ्ठलराव शिंदे ,पांडुरंग, सहकार महर्षी ,आदिनाथ हे सर्व उजनीच्या पाण्यामुळे अस्तित्वात आलेले साखर कारखाने आहेत.पण आज ह्या सर्वांमध्ये फरक पडला आहे हे आपण सर्वजण पाहत आहोत. मोहिते पाटलांचा सहकारमहर्षीचा दर हा शिंदे परिचारकांच्या कारखान्यापेक्षा कायम टनाला ३०० रुपयांनी कमी आहे.या कारणांमुळे आज माळशिरस तालुक्यात मोहिते पाटलांच्या कारखान्याला ऊस घालण्याची लोकांची मानसिकता राहिलेली नाही.त्यामुळे त्या कारखान्याचे गाळप सुद्धा दिवसेंदिवस कमी होत आहे.त्यासाठी आता त्यांना नवीन बाजारपेठ शोधायची आहे. म्हणून त्यांनी आपला करमाळा तालुक्यातील त्यांचा चेला असणाऱ्या विद्यमान आमदाराला पुढे करून आदिनाथ ताब्यात घेण्याचे मनसुबे आखले आहेत.
जेणेकरून आदिनाथ चालणारच नाही आणि चालू करण्याचा प्रयत्न झाला परंतु गाळप होऊ शकले नाही तर आदिनाथ तर्फे सहकारमहर्षी असा ऊस पाठवायचा.विद्यमान आमदाराकडे एक टिपरू गाळप करण्यासाठी साधे गुराळ सुद्धा नाही आणि मग कार्यकर्त्यांचे ऊस घालण्यासाठी ते सहकार महर्षीच्या वळचणीला आदिनाथ कारखाना बांधतील. मुळातच अडचणीत असलेला सहकार महर्षी कारखाना शेतकऱ्यांना उच्चांकी दर देऊ शकणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होईल. आदिनाथ ची निवडणूक दिसते तेवढी साधी ,सोपी, सरळ नाही त्यामागे फार मोठे राजकारण आणि अर्थकारण शिजत आहे. मोहिते पाटलांकडून माढा,पंढरपूर,माळशिरस या तीन तालुक्यांमध्ये गाढवाचा नांगर फिरवून झालेला आहे .आता त्यांची वाकडी नजर करमाळ्यावर पडलेली आहे.आणि ही सर्व सेना आपल्या करमाळ्यावर गाढवाचा नांगर फिरवण्यासाठी सज्ज झालेली आहे.त्यामुळे सभासदांनों सुज्ञ पणे विचार करून डोळस निर्णय घ्या असे आवाहन त्यांनी केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

21 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

2 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

2 days ago