Categories: करमाळा

ज्येष्ठ पत्रकार नरसिंह (आप्पा) चिवटे यांचा १९ एप्रिलला अभिष्टचिंतन सोहळा

करमाळा (प.प्र.) : करमाळा येथील ज्येष्ठ पत्रकार स्वातंत्र्य सैनिक वारसदार उच्चधिकारी संघटनेचे सचिव व महाराष्ट्र सिड्स पेस्टीसाईड फर्टीलायझर्सचे सचिव नरसिंह (आप्पा) मनोहरपंत चिवटे यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त १९ एप्रिलला सायंकाळी चार वाजता अमरनाथ टॉवर, कमलादेवी रोड, येथे अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले, पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार शहाजी पाटील, मनोहर चंद्रिकापुरे, प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू, आमदार राजाभाऊ खरे (मोहोळ), राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत पाटील (संभाजीनगर), लिंगायत संघर्ष समितीचे अध्यक्ष काकासाहेब कोकाटे, महाराष्ट्र वीरशैव सभा चे अध्यक्ष सुनीलशेठ रूकारी, उद्योजक बाजीराव चव्हाण (मुंबई), उदय चंद्रा आण्णा (मुंबई), शिवचरित्रकार यशवंतराव गोसावी (नाशिक) आदी मान्यवरांसह आमदार नारायण पाटील, माजी आमदार संजयमामा शिंदे, जयवंतराव जगताप, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, मकाईचे माजी चेअरमन दिग्विजय बागल, दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ आदीजण उपस्थित राहणार आहेत. अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सकाळी दहा ते पाच या वेळेत मोफत आरोग्य शिबीर, चष्मा वाटप व औषधे वाटप केली जाणार आहेत. सायंकाळी चार वाजता नरसिंह चिवटे यांचा नागरी सत्कार केला जाणार असून सायंकाळी सात ते दहा राष्ट्रीय किर्तनकार ह.भ.प.संग्राम बापू भंडारे यांचे किर्तन होणार आहे. कार्यक्रमास नागरीकांनी उपस्थित रहावे; असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे वेद्यकिय कक्षप्रमुख म़ंगेश चिवटे परिवाराच्यावतीने केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

20 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

2 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

2 days ago