Categories: करमाळा

स्व.डॉ. प्रदीपकुमार जाधव-पाटील यांच्या जयंतीनिमित्त सुपर स्पेशालिटी शिबीर, रक्त तपासणी व मुळव्याध उपचार शिबीर

करमाळा (प.प्र.) : आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन स्व.डॉ. प्रदीपकुमार जाधव-पाटील यांच्या १८ एप्रिल रोजी असणाऱ्या जयंतीनिमित्त आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था व जाधव-पाटील हॉस्पिटल यांच्या वतीने मोफत सुपर स्पेशालिटी शिबीर, सवलतीच्या दरात रक्त तपासणी शिबीर व सवलतीच्या दरात मुळव्याध उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.                             १८ एप्रिलला मोफत सुपर स्पेशालिटी शिबीर जाधव-पाटील हॉस्पिटल, करमाळा येथे होणार असून यामध्ये हृदयरोग तज्ञ, अस्थीरोग तज्ञ, पोटविकार तज्ञ, फुफ्फुसाचे तज्ञ, नवजात शिशु हृदयरोग तज्ञ, कॅन्सर तज्ञ, मानसोपचार व मेंदू विकार तज्ञ, न्यूरो सर्जन आदी मान्यवर तज्ञांकडून विविध आजारावरील रूग्णांची मोफत तपासणी केली जाणार आहे. हे शिबीर सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत चालू राहणार आहे. १८ एप्रिलला जिजाऊ पॅथॉलॉजी लॅबच्या वतीने १५ ते २० एप्रिल या कालावधीत सवलतीच्या दरात रक्ताच्या चाचण्या केल्या जाणार आहेत; अशी माहिती डॉ. शिवानी रोहन पाटील यांनी दिली.२० एप्रिलला सवलतीच्या दरात मुळव्याध उपचार शिबीर सकाळी आठ ते तीन या वेळेत जाधव-पाटील हॉस्पिटल येथे संपन्न होणार असून यामध्ये प्रसिध्द मुळव्या तज्ञ डॉ. प्रदीप तुपेरे हे रूग्णांची तपासणी करणार आहेत. तरी रुग्णांनी आपली नांवनोंदणी करून या शिबीराचा लाभ घ्यावा; असे आवाहन डॉ. रोहन जाधव-पाटील व डॉ. शिवानी रोहन पाटील यांनी केले.

saptahikpawanputra

Recent Posts

यशवंत शिंदे यांची नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी! ४१ व्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकमाढा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

करमाळा प्रतिनिधी  निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा…

2 hours ago

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना पुरी (ओडिशा) येथे ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…

8 hours ago

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

1 day ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

6 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago