Categories: Uncategorized

पोलीस निरीक्षक श्री विनोद घुगे प्रभारी अधिकारी करमाळा पोलीस ठाणे यांची हद्द‌पारबाबत दमदार कामगीरी

करमाळा प्रतिनिधी पोलीस निरीक्षक श्री विनोद घुगे प्रभारी अधिकारी करमाळा पोलीस ठाणे यांनी हद्द‌पारबाबत दमदार कामगीरी केलेली आहे. करमाळा पोलीस ठाणे हद्दीत महिला विषयी, मालाविषयी, शरीराविषयी, वाळू चोरी (वाळु माफिया), तसेच प्राण्यांची वाहतुक करून कत्तल करणारे इसमांविरूध्द असे विविध प्रकारचे गुन्हे दाखल असलेले इसमांची नावे पुढील प्रमाणे १) उमेश राजेंद्र गलांडे रा. चिखलठाण नं १, ता. करमाळा, २) शाहरूख आयुब कुरेशी, रा. मौलाली माळ करमाळा, ता. करमाळा, ३) समाधान उर्फ दत्तात्रय कल्याण लोहार, रा. निमगाव, ता. करमाळा, ४) संपत विठ्ठल मारकड, रा.शेलगाव वांगी, ता. करमाळा, ५) संतोष बिभिषण फरतडे, रा. सातोली, ता. करमाळा, ६) करण अंबादास खरात, रा. सिध्दार्थनगर करमाळा, ता. करमाळा, ७) आशपाक बाबासाहेब मुलाणी रा. कंदर, ता. करमाळा, ८) ओंकार दादासाहेब पुजारी, रा. देवीचा माळ करमाळा, ता. करमाळा, यांचेविरूध्द दाखल गुन्हयाचा तपास करून मा. न्यायालयात दोषारोपपत्र पाठविले तसेच त्याचे हातून भविष्यात गुन्हे घडून सार्वजनिक शांतता भंग होवून नये म्हणून वेळोवेळी प्रतिबधंक कारवाई करण्यात आली परंतु तरी सुध्दा त्याच्या वर्तनात कोणत्याही प्रकारची सुधारणा झाली नाही उलट ते पुन्हा पुन्हा गुन्हे करून लागले. तसेच करमाळा तालुका परिसरातील गोरगरीब जनता ही त्याचे दहशतीस घबरून पोलीस ठाणेस तकार करण्यास धजावत नाहीत. जनतेमध्ये भितीचे व दहशतीचे तसेच घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या जिवीतास धोका भय व इजा होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. असे दिसून आल्याने लोकांना भयमुक्त करण्यासाठी व समाजाचे दैनदिन जीवन सुरळीत व शांततामय होण्यासाठी तसेच सामाजिक स्वास्थ व मालमत्तेस धोका होवून नये या करीता वरील सर्व इसमांना मा. उपविभागीय दंडाधिकारी, माढा विभाग कुर्दुवाडी यांनी सोलापूर, पुणे, धाराशिव या जिल्यातून ६ महिने ते २ वर्षाकरीता हद्दपार करण्याचे आदेश पारित केल्याने त्याना मा. पोलीस निरीक्षक श्री. विनोद घुगे, करमाळा पोलीस ठाणे यांनी ताबे पोलीस मार्फत सदर तडीपार इसमांना सोलापूर जिल्याचे बाहेर सोडण्यात आले आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री. विनोद घुगे, करमाळा पोलीस ठाणे यांनी मा. पोलीस अधिक्षक, श्री. अतुल कुलकर्णी सो, सोलापूर ग्रामीण, अपर पोलीस अधिक्षक, श्री. प्रितम यावलकर, सोलापूर ग्रामीण, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अजित पाटील, करमाळा उपविभाग, करमाळा यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून त्यास करमाळा पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथक तसेच करमाळा पोलीस ठाणे कडील अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने केली आहे.

 गुन्हेगारी वृत्तीचे लोक त्यामध्ये वाळू वोरी, प्राण्यांची कत्तल करणारे, बेकायदेशीर सावकारी करणारे, तसेच महिलाची छेडछाडी करणारे, मालाविषयी गुन्हे करणारे, व शरीराविषयी गुन्हे करणारे असे विविध प्रकारचे गुन्हे करणारे इसमांची यादी तयार करून त्याचेवर हद्दपारीची कार्यवाही प्रस्तावीत आहे.                       विनोद घुगे साहेब पोलिस निरीक्षक करमाळा 

 

saptahikpawanputra

Recent Posts

यशवंत शिंदे यांची नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी! ४१ व्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकमाढा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

करमाळा प्रतिनिधी  निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा…

5 hours ago

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना पुरी (ओडिशा) येथे ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…

11 hours ago

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

1 day ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

6 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago