करमाळा नगरपरिषदेच्या वतीने 150 क्षमतेचे कोवीड केअर सेंटरची निर्मिती – वेैभवराजे जगताप नगराध्यक्ष  करमाळा न.प.

करमाळा प्रतिनिधी
करमाळा नगरपरिषदेच्या अखत्यारीतील नगरपालिकेच्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रशाला येथे करमाळा नगरपरिषदेच्या वतीने 150 क्षमतेचे कोवीड केअर सेंटर निर्माण करण्याकरिता पुढाकार घेऊन महत्वाची भूमिका पार पाडली आहे.
दि.27 जुलै 2020 रोजी मा.गृहराज्यमंत्री श्री.शंभुराजे देसाई साहेब,मा.आमदार श्री.संजयमामा शिंदे साहेब,मा.जिल्हाधिकारी श्री. मिलींद शंभरकर साहेब यांनी करमाळा नगरपरिषदेने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व सर्व कामांचा आढावा घेतला व उत्कृष्ठ काम केल्याबद्दल प्रशंसाही केली, याच बैठकीत मा.नगराध्यक्ष श्री.वेैभवराजे जगताप यांनी करमाळा नगरपरिषदेच्या शाळेत कोवीड केअर सेंटर उभारण्याची तयार दर्शविली व त्यानुसार शौचालय, बाथरुम, पाणी, लाईट, फॅन,, जाळीयुक्त खिडक्या , गरम पाण्याची सोय, योगा व व्यायामाकरीता स्टेज या अनुषंगीक गोष्टीची उपलब्धता करमाळा नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. याच बरोबर याच शाळेत प्राथमिक लक्षणे दिसणाऱ्या रुग्णाकरिता तपासणी करिता फिव्हर सेंटर उपलब्ध करुन देण्यात आले आहे तसेच याच शाळेत कोरोना चाचणीकरिता रुग्णाचे स्वॅब सॅम्पल घेणे, रॅपिड ऍ़न्टीजीन टेस्ट घेणे याकरिता तपासणी केंद्राकरिता आवश्यक सुविधा जसे फॅन,निर्जंतूकीकरण व इतर साहित्य नगरपरिषदेने उपलब्ध करुन दिले आहे.
सदर कोवीड केअर सेंटरचे उद्घाटन दि.15 ऑगस्ट 2020 रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मा.नगराध्यक्ष श्री.वैभवराजे जगताप यांच्या हस्ते करण्यात आले व इमारतीचा ताबा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.घोगरे यांच्याकडे देण्यात आला. सदर कोवीड केअर सेंटर उभारणेकामी मा.प्रांताधिकारी ज्योती कदम  मॅडम व मा.तहसिलदार समीर माने साहेब यांनी वेळोवेळी मार्गदर्शन व पाठपुरावा केला.
सदर कोवीड केअर सेंटर उभारणीकामी करमाळा नगरपरिषदेच्या सर्व सन्माननिय सदस्य यांच्याकडून मा.सर्वसाधारण सभेत मान्यता देण्याकरिता ठराव संमत केला जाणार आहे. सदर कामी करमाळा नगरपरिषदेच्या मा.मुख्याधिकारी वीणा पवार यांनी उल्लेखणीय कामगिरी बजावली आहे. तसेच शहर अभियंता श्री.समेशर पठाण,पाणीपुरवठा वार्ड ऑफिसर श्री.कमलाकर भोज, विद्युत वार्ड ऑफिसर श्री.बाळनाथ क्षिरसागर व सर्व कर्मचारीवृंद यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.
सदर कोवीड केअर सेंटर उभारल्यामुळे कोरोना रुग्णाच्या वाढत्या संख्येकडे बघता निश्चित योग्यसोय होणार आहे. सदर उद्घाटन प्रसंगी करमाळा तालुक्याचे तहसिलदार श्री.समीर माने,पोलिस निरीक्षक श्री. श्रीकांत पाडुळे, तालुका वैद्यकीय अधिकारी श्री. घोगरे, वैद्यकीय अधिकारी श्री. अमोल डुकरे, बांधकाम उप अभियंता श्री.निमकर हे उपस्थित होते. तसेच सर्व करमाळा नगरपरिषद कर्मचारीवृंद, सर्व कुटीर रुग्णालय कर्मचारीवृंद सर्व तहसील आपत्ती व्यवस्थापन विभाग कर्मचारीवृंद उपस्थित होते.यावेळी कोरोनासांकटात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कोव्हिड केअर सेःटरषचे सर्व डाँक्टर व स्टाफ,पोलीस स्टाफ,तहसील स्टाफ,नगरपरीषद स्टाफ यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
———————————————————————————-.
करमाळा शहराचा प्रथम नागरिक या नात्याने कोरोनाच्या संकटात नागरिकांची करमाळा शहरातच वैद्यकीय उपचारांची सुविध उपलब्ध करुन देण्यासाठी कोवीड केअर सेंटर करमाळा नगरपरिषदेने उभारले आहे. कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी व नागरिकांची सेवा करण्यासाठी मी कटीबध्द आहे. अध्यक्ष वैभवराजे जगताप, करमाळा नगरपरिषद

———————————————————————————-
करमाळा नगरपरिषदेच्या माध्यमातून कोवीड केअर सेंटर उभारले जाणे ही खरोखर खूप अभिमानाची व गौरवास्पद  गोष्ट आहे याकरिता मी सर्व सन्माननिय नगरपरिषद पदाधिकारी, नगरसेवक यांचे कौतुक करते व आभार व्यक्त करते.- वीणा पवार मुख्याधिकारी करमाळानगरपरिषद.

saptahikpawanputra

Recent Posts

भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची गुरुकिल्ली -साध्वी प.पू अनुराधा दिदी शेटे पंढरपूरकर

करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…

9 hours ago

भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देवळाली येथे नेत्ररोग तपासणी संपन्न

करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…

23 hours ago

अवैध वाळु उपसा बंद करा आमदार नारायण पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पञ

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…

24 hours ago

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

2 days ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

4 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

4 days ago