Categories: Uncategorized

पत्रकारांच्या मुला-मुलींच्या करिअर व कुटुंबाच्या आरोग्यासाठी “प्रतिबिंब” प्रतिष्ठान मदत करणार-राजा माने

*गरजू पत्रकारांनी मदत मागणीचे प्रस्ताव पाठविण्याचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांचे आवाहन*

मुंबई, दि.: राज्यातील गरजूl पत्रकारांच्या मुला-मुलींचे शिक्षण,कला,क्रीडा,संशोधन क्षेत्रात करिअर व्हावे यासाठी तसेच पत्रकारांच्या कुटुंबांच्या आरोग्य विषयक समस्या दूर करण्यासाठी “प्रतिबिंब प्रतिष्ठान” आवश्यक ते सहाय्य करणार आहे.विशेष गुणवत्ता व नैपुण्य असणाऱ्या मुला-मुलींच्या पालक पत्रकारांनी आपले सहाय्य मागणीचे प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी येथे केले.
पत्रकारांच्या कुटुंबांच्या आरोग्य विषयक समस्या दूर करण्यासाठी देखिल या प्रतिष्ठानच्या माध्यमातून पत्रकारांना मदत केली जाणार आहे. पत्रकारांच्या मुला-मुलीचे कला, क्रीडा, संशोधन या क्षेत्रातील करिअर घडविण्यास मदत करण्याबरोबरच मुलींच्या शिक्षणासाठी अधिक भर प्रतिष्ठान देत आहे. राज्यातील गरजू व पात्र पत्रकारांनी आपल्या पाल्यांचे मागणी प्रस्ताव दि.५ मे २०२५ पर्यंत आपल्या विभागातील डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्याअध्यक्षाच्या शिफारसीसह पाठवावे.
pratibimbapratishthan1@gmail.com
या ईमेल आयडीवर तसेच 9922928152 या व्हॉट्सॲप नंबरवर अर्ज पाठविण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तसेच डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांनी केले आहे.
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या कणेरी मठ कोल्हापूर येथे गतवर्षी झालेल्या अधिवेशनात उद्घाटक म्हणून बोलताना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकारांच्या कुटुंबासाठी आणि विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी मदत करणारे प्रतिष्ठान स्थापन करण्याची सूचना केली होती. लोकवर्गणीच्या माध्यमातून हे प्रतिष्ठान सक्षम करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी त्यावेळी दिले होते. राज्यातील पत्रकारांच्या कुटुंबांच्या हिताचा चंद्रकांतदादा पाटील यांनी विचार करुन केलेल्या सूचने नुसार प्रतिबिंब प्रतिष्ठानची स्थापना केली आहे. खऱ्या गरजू पत्रकारांच्या कुटुंबांचे हित जपण्याचा प्रयत्न पारदर्शी कार्याने करेल असे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी म्हटले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा इंग्लिश स्कूल संघटनेच्या नुतन तालुका अध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती

करमाळा प्रतिनिधी  महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…

21 hours ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांना ‘ज्ञानज्योती आदर्श पुरस्कार’ प्रदान

करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…

22 hours ago

गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबतर्फे गणेशोत्सवानिमित्त १६ सप्टेंबरला मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबिराचे आयोजन – प्रशांत ढाळे

  करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…

1 day ago

२५ सप्टेंबरपासून करमाळ्यात खत विक्रीला ‘FFS’ प्रणाली गुणनियंत्रण कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांचा विक्रेत्यांना इशारा लिंकिंग, काळाबाजार व चढ्या दराने विक्री केल्यास कडक कारवाई

करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…

2 days ago