Categories: करमाळा

भारतीय जनता पार्टी करमाळा ग्रामीण तालुकाध्यक्षपदी मकाईचे संचालक सचिन पिसाळ यांची निवड

करमाळा प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी करमाळा तालुका ग्रामीण अध्यक्षपदी पांगरे गावचे माजी उपसरपंच मकाई सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक सचिन बापू पिसाळ यांची पुनश्च निवड करण्यात आली आहे. त्यांची निवड  निवडणूक अधिकारी निरीक्षक म्हणून श्री बाळकृष्ण येल्पले यांनी उपस्थित राहून त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. तसेच यावेळी भारतीय जनता पार्टी करमाळा शहर साठी काकासाहेब सरडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली त्यांच्या नावाची घोषणा काकडे यांनी केली. सोलापूर येथे भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे भारतीय जनता पार्टी बाळकृष्ण येलपल्ले यांच्या हस्ते शाल श्रीफळ मानाचा फेटा बांधून सत्कार करून करण्यात आला. यावेळी जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, जिल्हा उपाध्यक्ष एडवोकेट भगवान गिरी, माजी तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शुभम बंडगर ,शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, उपस्थित होते.भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्ष रश्मी दीदी बागल , मार्गदर्शक विलासराव घुमरे सर जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार यांच्या सहकाऱ्यांने युवकाचे संघटन करून करमाळा तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे काम वाढवणार असल्याचे सचिन पिसाळ यांनी सांगितले. सचिन पिसाळ पांगरे गावचे माजी उपसरपंच असून मकाई सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक म्हणून काम करत आहेत सचिन पिसाळ यांनी ग्रामीण भागामध्ये चांगले काम केल्यामुळे भारतीय जनता पार्टी करमाळा ग्रामीण तालुका अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. भाजप महायुती सरकारने ‌ लाडकी बहीण योजना, ‌शेतकरी वीज माफी योजना, वयोश्री योजना, बांधकाम कामगार कल्याण योजना, शेतकरी पेन्शन योजना यासारख्या आणि कल्याणकारी योजना राबवून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम केले आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ‌ लोक कल्याणकारी योजना करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागापर्यंत पोहोचवुन सर्वसामान्य ‌ नागरिकांना न्याय मिळवून देणार आहे. करमाळा तालुक्यामध्ये गावागावात ‌ भाजपच्या शाखा ‌ काढून करमाळा तालुका भाजपामय करणार असल्याची सचिन पिसाळ यांनी सांगितले. त्यांच्या निवडीचे स्वागत करमाळा तालुक्यातील विविध स्तरातून होत आहे. त्याचबरोबर करमाळा तालुक्याचे युवा नेते मा. दिग्विजय बागल मकाई कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर आदिनाथचे माजी संचालक ॲड दत्तात्रय सोनवणे यांनी अभिनंदन केले असून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा येथील सेवानिवृत्त नगरपालिका कर्मचारी मोहम्मद खान यांचे निधन

करमाळा प्रतिनिधी  करमाळा येथील सेवानिवृत्त नगरपालिका कर्मचारी हाजी मोहम्मद महेबूब खान पठाण उर्फ खान चाचा…

3 hours ago

*स्व.काकासाहेब थोबडे चषकाचे उपविजेते होत करमाळा वकील संघाने केली दमदार कामगिरी

करमाळा प्रतिनिधी- सोलापुर येथे चालु असलेल्या स्व. काकासाहेब थोबडे चषकामधे करमाळा वकील संघाने दमदार कामगिरी…

1 day ago

प्राध्यापक डॉ. शरद जाधव यांना संगणकशास्त्राची पीएचडी पदवी

  करमाळा प्रतिनिधी  भालेवाडी (ता. करमाळा) येथील रहिवासी तथा महात्मा गांधी ज्युनिअर कॉलेज, करमाळा येथे…

1 day ago

जिल्हा दिव्यांग अधिकारी दक्षिण सोलापूरचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांची मुकबधीर शाळेला भेट दिव्यांग विद्यार्थ्यांसमवेत अधिकाऱ्यांचे जेवण

करमाळा प्रतिनिधी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी पदाचा नुकताच पदभार स्वीकारलेले दक्षिण सोलापूरचे गटविकास अधिकारी मनोज…

1 day ago

एन.सी.सी. हे देशसेवा व करिअर घडवण्याचे माध्यम’ -विलासरावजी घुमरे

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय मध्ये एनसीसी विभागातर्फे आर्मी, वायुसेना, पोलीस भरती इत्यादी…

2 days ago