Categories: Uncategorized

करंजे गावचे माजी सरपंच काकासाहेब सरडे यांची करमाळा भाजपा तालुका अध्यक्षपदी निवड

करमाळा प्रतिनिधी – संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक निवडी काल प्रदेश पातळीवरून जाहीर करण्यात आल्या व प्रत्येक तालुक्यामध्ये निवडणूक प्रमुखांनी नवनिर्वाचित तालुका अध्यक्षांना निवडीचे पत्र दिले यामध्ये करमाळा मंडल साठी करंजे गावचे माजी सरपंच काकासाहेब सरडे यांची निवड करण्यात आली आहे, शेलगाव येथील शिवम प्राइड हाॅटेल येथे भारतीय जनता पार्टीच्या बैठकीत त्यांना निवडणूक प्रमुख संदेश काकडे यांनी निवडीचे पत्र देऊन तालुका अध्यक्षपद घोषित केले, तसेच करमाळा ग्रामीण मंडळासाठी सचिन पिसाळ यांची निवड करण्यात आली आहे, या निवडीवेळी प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे उपस्थित होते,
ही निवड झाल्यानंतर काकासाहेब सरडे यांनी बोलताना सांगितले की मी गेली अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे काम करत आहे त्यामुळे माझ्यावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब , प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब , कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब , पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब , माढा लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार- सावंत व आमचे नेते गणेश चिवटे यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला आहे तो सार्थ ठरवून तालुक्यातील प्रत्येक गावात भारतीय जनता पार्टी तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी अविरतपणे काम करणार आहे व येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीय जनता पार्टी सर्व निवडणुकीला सामोरे जाऊन करमाळा तालुका भाजपमय करण्यासाठी येणाऱ्या काळात ताकदीनिशी काम करणार असल्याचे सरडे यांनी सांगितले,
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अफसर तात्या जाधव, तालुका अध्यक्ष रामभाऊ ढाणे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, भगवान गिरी गोसावी, निवडणूक निर्णय अधिकारी संदेश काकडे, यलपले साहेब, नितीन झिंजाडे, बंडू शिंदे, मोहन शिंदे, डॉ अभिजीत मुरूमकर, सोमनाथ घाडगे, अशोक ढेरे, लक्ष्मण शेंडगे, लक्ष्मण केकान, शुभम बनगर ,अमोल जरांडे, दत्तात्रय पोटे, सागर सरडे, हर्षद गाडे, किरण शिंदे, नाना अनारसे,रंजित पवार, नागनाथ केकान, प्रमोद सोनवने, दिगंबर राखुंडे , कपिल मंडलिक, रविकिरण माळवे, चंद्रशेखर सरडे, यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते,

saptahikpawanputra

Recent Posts

दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या आवर्तनासाठी संजयमामा शिंदे ॲक्शन मोडवर! पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन आवर्तन एक महिना अगोदर सुरू करण्याची मागणी

  करमाळा प्रतिनिधी : दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या आवर्तनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी आमदार संजयमामा…

3 days ago

करमाळा शहरातील दिव्यरत्न सिटी येथे चॅम्पियन क्लब हाऊसच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेचे सचिन (मालक) गायकवाड यांच्या हस्ते दिमाखात उद्घघाटन

करमाळा (प्रतिनिधी) : करमाळा शहरातील दिव्यरत्न सिटी येथे चॅम्पियन क्लब हाऊसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या…

5 days ago

ऊसदर आणि अतिवृष्टी अनुदानासाठी १३ नोव्हेंबर रोजी करमाळ्यात शेतकऱ्यांची बैठक; आंदोलनाची दिशा ठरणार – राजाभाऊ कदम

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी शुक्रवार, दि. १३ नोव्हेंबर २०२६…

6 days ago

दुष्काळात मुक्या जीवांसाठी कै बाबुराव (तात्या) गायकवाड प्रतिष्ठानचा माणुसकीचा झरा सात वर्षांपासून वन्यजीवांसाठी चारा-पाण्याची अखंड सेवा

करमाळा प्रतिनिधी दुष्काळाच्या झळा केवळ माणसांनाच सोसाव्या लागत नाहीत, तर जंगलातील मुके वन्यजीवही पाण्याच्या थेंबासाठी…

7 days ago