Categories: करमाळा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्ताने आयोजित ” धनगरी रूद्रनाद ” कार्यक्रमा बाबत संवाद साधण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर आज करमाळ्यात

.

करमाळा प्रतिनिधी – बहुजन ह्दय सम्राट आमदार गोपीचंद पडळकर हे  बुधवार दि. 23 एप्रिल रोजी करमाळा येथे येत असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्ताने आयोजित ” धनगरी रूद्रनाद ” कार्यक्रमा बाबत अहिल्याप्रेमी जनतेशी संवाद साधणार आहेत. अहिल्याप्रेमी जनतेने बुधवारी सकाळी 10.30 वाजता जुने गेस्टहाउस, करमाळा येथे सकाळी उपस्थित रहावे असे आवाहन सकल धनगर समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची या वर्षी 300 वी जयंती आहे . सन 2025 या वर्षात महाराष्ट्र सह देशभर विविध कार्यक्रम संपन्न होत आहेत. दि 31 मे रोजी पंतप्रधान नरेन्द्र मोदी हे अहिल्या जन्मस्थळ चोंडी या ठिकाणी येत आहेत. अहिल्यादेवी होळकर यांच्या सन्मानार्थ पुढील आठवड्यात चोंडी येथे राज्य मंत्रिमंडळाची बैठक देखील येथे होत आहे. थोडक्यात शासनाच्या पातळीवर तसेच विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून त्रीशताब्दीचे भव्यदिव्य असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.असाच एक कार्यक्रम “पुण्यश्लोक@ 300″ निमीत्ताने 50,000 ढोल वादनाचा विश्वविक्रम नोंदवणारा कार्यक्रम पुण्यात 15 मे रोजी आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमास केंद्रीय ग्रहमंत्री अमित शहा , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमात धनगर समाजाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवींना अभिवादन करताना आदीम धनगरी संस्कृतीचे दर्शन जगभरातील जनतेला घडविण्यासाठी पन्नास हजार धनगरी ढोल वादनाचा ” धनगरी रूद्रनाद ” हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमात राज्यभरातील अहिल्याप्रेमी जनतेचा उस्फूर्त सहभाग वाढविण्यासाठी व या कार्यक्रमाची रूपरेखा लोकांना सांगण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर हे राज्यभर दौरा करत आहेत.या दौर्‍यादरम्यान पडळकर करमाळा येथे संवाद साधून सहभाग वाढविण्यासाठी , नियोजनाबद्दल माहीती देण्यासाठी करमाळा येथ बुधवारी सकाळी 11 वाजता करमाळा येथे येत आहेत.तरी करमाळा तालुक्यातील अहिल्याप्रेमी नागरिकांनी जुने गेस्ट हाऊस, कोर्टाशेजारी,करमाळा येथे बहुसंख्येने सकाळी 10.30 वाजता हजर रहावे असे आवाहन करमाळा तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 hours ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

17 hours ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

20 hours ago

करमाळा पोलिसांचा दणका ट्रॅक्टर चोरीचा छडा; ३.७५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत वीट येथील शेतातून ट्रॅक्टर लंपास; तांत्रिक तपासातून दोघे ताब्यात

करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…

1 day ago

श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

  करगाळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षा…

3 days ago