Categories: करमाळा

श्री आदिनाथ साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अथवा व्हाईस चेअरमनपदी जेष्ठ संचालक डॉ. हरिदास केवारे यांची निवड करण्याची मागणी

करमाळा प्रतिनिधी श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सोसायटी मतदारसंघातून डॉक्टर हरिदास केवारे यांची सहाव्या वेळी बहुमताने संचालकपदी निवड झाली आहे. त्यामुळे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अथवा व्हाईस चेअरमनपदी त्यांची निवड करून त्यांच्या ज्येष्ठतेचा कार्याचा गौरव करावा अशी मागणी ऊस उत्पादक सभासदांमधून होत आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या या निवडणुकीमध्ये आमदार नारायण आबा पाटील यांच्या संजीवनी पॅनल मधून डॉक्टर हरिदास केवारे सर्वात प्रथम ‌ निवडून आलेले उमेदवार असून ‌ त्यांना आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा कामाचा मोठा प्रदीर्घ अनुभव असून त्याचा फायदा आदिनाथ कारखाना चालू करण्यासाठी होऊ शकतो. ज्येष्ठतेनुसार  चेअरमन अथवा व्हाईस चेअरमनपदाची  जबाबदारी पार पाडण्यासाठी सक्षम अनुभवी असल्याने प्रबळ दावेदार आहेत .त्यामुळे सध्या बंद अवस्थेत असलेला आदिनाथ कारखाना पूर्ण क्षमतेने चालू करून  यशस्वी गाळप करण्यासाठी सहाव्यांदा निवडून आलेल्या जेष्ठ संचालक डॉक्टर हरिदास केवारे यांची चेअरमन पदी अथवा व्हाईस चेअरमन पदी निवड करावी अशी मागणी शेतकरी सभासदांनी केली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

35 mins ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

20 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

23 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

1 day ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago