Categories: Uncategorized

आमदार नारायण आबा पाटील यांच्या प्रयत्नातून आता आणखी पाच एस टी बस करमाळा आगारात दाखल होणार

करमाळा प्रतिनिधी आमदार नारायण आबा पाटील यांनी नामदार प्रताप सरनाईक यांचेकडे करमाळा आगारासाठी एकुण वीस नवीन एस टी बसेस मागितल्या होत्या. पहिल्या टप्प्यात काही नवीन बस मिळाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात चार नवीन एस टी बस करमाळा आगारासाठी देण्याचा निर्णय झाला. परंतू आमदार नारायण आबा पाटील यांनी वरिष्ठांना करमाळा आगारात आणखी बसेस मिळाव्यात म्हणुन विनंती केली. यावेळी त्यांनी केलेल्या आग्रहा खातर परिवहन महामंडळा कडून चार ऐवजी पाच बस देण्यात आल्या आहेत. यामुळे आता करमाळा आगारास पाच नवीन बस मिळणार असुन आज या गाड्या करमाळा आगारात दाखल होतील. सदर पाच गाड्यांचा ताबा घेण्यासाठी कालच करमाळा आगारातील वाहक दापोडी येथे गेले असुन तेथून त्यांना या गाड्या प्राप्त करुन दिल्या जातील अशी माहिती आहे.यामुळे आता पाच गाड्या मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून आज
दिवसभरात या गाड्या करमाळा आगारात दाखल होतील. यामुळे आता करमाळा तालुक्यातील दळणवळण प्रश्न बऱ्यापैकी सुटला जाऊ शकेल. उर्वरित नवीस एस टी बसेस सुध्दा येत्या काही महिन्यात करमाळा आगारासाठी उपलब्ध होतील असा आमदार नारायण आबा पाटील यांना विश्वास आहे. करमाळा आगारासाठी नवीन चार गाड्या दिल्याने प्रवासी, रुग्ण, वृध्द, महिला व खास करुन शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा प्रवासाचा प्रश्न सुटला जाईल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे करमाळा तालुक्यातील नागरिकांच्या व विविध शैक्षणिक संस्था तसेच व्यापारी मंडळाच्या वतीने आभार व्यक्त केले जात आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानंतर निदर्शन आंदोलन स्थगित- वैभवराजे जगताप.

करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…

2 days ago

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

2 days ago

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

2 days ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

5 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

7 days ago