Categories: करमाळा

समाजकारणातून राजकारणात यशस्वी वाटचाल करणाऱ्या सावंत कुटुंबाचे करमाळा तालुक्याच्या विकासासाठी महत्वपुर्ण योगदान -आमदार नारायण आबा पाटील

करमाळा प्रतिनिधी समाजकारणातून राजकारणात यशस्वी वाटचाल करणाऱ्या सावंत गटाचे करमाळा तालुक्याच्या विकासासाठी योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे मत करमाळा तालुक्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी व्यक्त केले नगरसेवक संजय उर्फ पप्पू भगवान सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त सावंत गल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराज तरूण मंडळाच्या वतीने भव्य नागरी सत्काराच्या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास करमाळ्याचे लोकप्रिय आमदार आमदार नारायण आबा पाटील , ज्येष्ठ पत्रकार ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष ॲड बाबुराव हिरडे आदिनाथचे माजी संचालक डॉ .वसंत पुंडे,शिवसेना जिल्हा उपप्रमुख संजय शिंदे , नगरसेवक अल्ताफ शेठ तांबोळी, नगरसेवक प्रशांत ढाळे, शिवसेना शहराध्यक्ष प्रवीण कटरिया आदिनाथ कारखान्याचे नूतन संचालक डॉक्टर हरिदास केवारे, ॲड राहुल सावंत, देवानंद बागल,डॉ. अमोल घाडगे, सावंत गटाचे नेते पै.सुनील सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील माजी नगरसेवक रवींद्र कांबळे, नगरसेवक अतुल फंड, गोविंद किरवे, ॲड नवनाथ राखुंडे,उद्योजक भावी नगरसेवक अल्लाउद्दीन शेख, ॲड बलवंत राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अरूण काका जगताप,अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था करमाळा तालुका अध्यक्ष संतोष काका कुलकर्णी, सुनील सावंत, करमाळा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष दिनेश मडके, दैनिक सकाळचे पत्रकार आण्णा काळे सर, जयंत दळवी ,फारुख जमादार उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना आमदार नारायण आबा पाटील म्हणाले की, समाजकारणातून राजकारणात यशस्वी वाटचाल करणारे सावंत कुटुंबाने राजकारणात किंगमेकरची यशस्वी भूमिका बजावली आहे. यामध्ये आदिनाथ कारखाना , जिल्हा परिषद व पंचायत समिती, नगरपालिका ,लोकसभा विधानसभा निवडणुकीत सावंत गट ज्यांना पाठबळ‌ देतो तो विजयी होतो असे समीकरण झाले आहे .शहरा बरोबरच तालुक्यामध्ये सावंत गट हाच खरा जनतेच्या मनातील जिव्हाळा असणारा एक प्रमुख घटक बनला आहे. त्यामुळे सावंत कुटुंबाला विविध राजकीय पदावर काम करण्याची संधी जनतेने दिली आहे. नगरसेवक संजय सावंत यांचे काम जनतेसाठी आदर्श असून सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहून काम करणारे संजय सावंत हे जनतेच्या मनातील जिव्हाळा असणारे नगरसेवक असून त्यांचे भविष्य उज्वल असून त्यांनी त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संजय उर्फ पप्पू सावंत यांना आमदार नारायण आबा पाटील यांनी शुभेच्छा देऊन सावंत गल्ली. येथील हनुमान मंदिरासाठी‌ सभा मंडपासाठी 30 लाख रुपये निधी निश्चित मंजूर करू अशी ग्वाही दिली तसेच सावंत कुटुंबाचे व पाटील कुटुंबाचे संबंध चार पिढ्यापासून असून कै.सुभाष अण्णा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात ग्रामपंचायत सदस्य म्हणून झाली आपले राजकारणापेक्षा प्रेमाचे कोटुंबिक जिव्हाळयाचे प्रेमाचे अतुट नाते असल्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले. यावेळी ग्राम सुधार समितीचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार बाबुराव हिरडे आदिनाथचे नूतन संचालक देवानंद बागल, डॉक्टर अमोल घाडगे, ॲड राहुल सावंत, ॲड बलवंत राऊत नगरसेवक अल्ताफशेठ तांबोळी,शिवसेना शहरप्रमुख प्रवीण कटारिया , नगरसेवक प्रशांत ढाळे, दलित सेनेचे जिल्हा सचिव एल डी कांबळे एडवोकेट नवनाथ राखुंडे हनुमंत मांढरे पाटील यांनी मनोगत व्यक्त करून नगरसेवक संजय सावंत यांना शुभेच्छा दिल्या आहेत . या कार्यक्रमामध्ये आमदार नारायण आबा पाटील यांनी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत एकहाती विजय मिळवल्याबद्दल‌ त्यांचा शाल श्रीफळ मानाचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला. जनतेचे लोकप्रिय नगरसेवक संजय उर्फ पप्पू सावंत यांना उपस्थित शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ मानाचा फेटा पुष्पहार घालून केक कापून त्यांचा सत्कार केला . हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आनंदात संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन संजय खारगे गुरुजी यांनी केले तर आभार सावंत गटाचे नेते पै.सुनील सावंत यांनी मानले. *चौकट- सावंत कुटुंबाच्या समाजसेवेचा वारसा जपण्याचे काम आपण काका विठ्ठल आप्पा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे.सर्वसामान्य जनतेच्या पाठबळावर आपण काम करत असून जनतेचे प्रेम आर्शिवाद आपल्या पाठीशी असल्याने आपली वाटचाल यशस्वीपणे चालू असल्याचे त्यांनी सांगितले.करमाळा शहरात बेरोजगारीचे प्रमाण मोठे असून तरुणांच्या हाताला काम मिळून देण्यासाठी लवकरच एक मोठा उद्योग उभा करणार असल्याचे नगरसेवक संजय उर्फ पप्पू सावंत यांनी सांगितले.*

saptahikpawanputra

Recent Posts

अखंड हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला करमाळ्यात भव्य रक्तदान शिबीर

करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…

13 hours ago

जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना; १ मार्च रोजी पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी होणार-पृथ्वीराज पाटील

करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…

18 hours ago

बार्शीचे मा.आमदार राजाभाऊ राऊत यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी – माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…

23 hours ago

डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांना दुबईत “पत्रकाररत्न” आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…

1 day ago

यशवंत परिवाराच्या वतीने स्व. अर्जुन तात्या फंड सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…

2 days ago

विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांना पितृशोक; अर्जुन तात्या फंड सर यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…

2 days ago