Categories: Uncategorized

काश्मीरमधील पहलगाम भागात पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा करमाळा मुस्लिम समाजाच्यावतीने निषेध दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्याची मागणी

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील आणि तालुक्यातील ग्रामीण भागातील मशिदीत शुक्रवारच्या नमाजपठण सर्व मुस्लीम बांधवांनी दंडाला काळ्या पट्ट्या बांधून नमाज पुर्ण केली आहे. घडलेल्या घटनेबद्दल निषेध म्हणून आणि या घटनेत मृत्यू झालेल्या निष्पाप नागरिकांबद्धल दुवा करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
काश्मीरमधील पहलगाम भागात पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा आम्ही संपूर्ण समाज तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या दुर्दैवी घटनेत काही निष्पाप पर्यटकांचा मृत्यू तर, काही जण गंभीर जखमी झाल्याचं वृत्त अतिशय धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारं आहे. ही मानवजातीची हत्या झाली आहे या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांना आम्ही सर्व समाजातील लोक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या कुटुंबियांप्रती सहसंवेदना व्यक्त करुन जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना केली*
हा भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवादी संघटना व त्यांच्या इतर संघटनांवर बंदी घालण्यात यावी व दोंषी दहशतवादी यांना फाशीची शिक्षा किंवा जागेवर कंठस्नान देण्यात यावे अशी मागणी भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाऊंडेशन करमाळा व सकल मुस्लीम समाज करमाळा यांच्या वतीने भारत सरकार यांच्याकडे केली आहे.
यावेळी जमियत उलमा हिद चे मौलाना मोहसीन , आयशा मस्जिद चे अबु रेहान , मक्का मस्जिद चे मौलाना सिकंदर, जामा मस्जिद चे मौलाना अनवर, आयशा मस्जिद चे मौलाना सय्यद अली, सुलेमानी मस्जिदचे मौलाना मोहम्मद फारुख रझा , सकल मुस्लीम समाज चे जमीर सय्यद , रमजान बेग सुरज शेख इकबाल,मजहर नालबंद .समीर बागवान ,आल्लाऊदिन शेख .मुस्तकीम पठाण , इम्तियाज पठाण अरबाज बेग शाहीद बेग कलीम शेख ,फिरोज बेग, कलंदर शेख, आलीम शेख, नजम शेख, अनवर शेख,अकीब सय्यद.हाजी ईम्रान.आजीम,शेख.अस्लम बेग.कबीर भाऊ साहेब . सद्दाम कुरेशी.अफजल शेख.जाकीर वस्ताद अरबाज घोडके .जाकीर पठाण अशरफ तांबोली .हाफ़िज़ अब्दुला सरफराज पठाण.सरफराज सय्यद.सुहेल मुलाणी. इसराइल राज. आमन शेख.अमीर वस्ताद उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

यशवंत शिंदे यांची नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी! ४१ व्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकमाढा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

करमाळा प्रतिनिधी  निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा…

2 hours ago

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना पुरी (ओडिशा) येथे ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…

8 hours ago

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

1 day ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

6 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago