महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परिक्षेत दत्तकला आयडियल स्कूल ॲन्ड ज्यूनिअर कॉलेज केत्तुर नं१ चे घवघवीत यश

करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परिक्षेत दत्तकला आयडियल स्कूल ॲन्ड ज्यूनिअर कॉलेज केत्तुर नं१ चे घवघवीत यश मिळवले आहे. 
सध्याच्या स्पर्धेच्या युगात शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेची आवड निर्माण व्हावी ,लहानपणापासूनच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा म्हणूमं थन,स्कॉलरशिप,नवोदय,गुरुकुल,गणित मंडळाच्या विविध स्पर्धा परिक्षा अशा विविध प्रकारच्या स्पर्धा परिक्षांना बसवले जाते. शालेय अभ्यासक्रमाबरोबर विविध स्पर्धा परिक्षेचा अभ्यासक्रम शिकवला जातो.सरावासाठी सराव परिक्षा घेतल्या जातात.शाळेचे मुख्याध्यापक श्री.विजय मारकड सर , परिक्षा विभाग प्रमुख बाबर सर, राऊत सर, सर्व शिक्षक यांचे मुलांना मार्गदर्शन लाभले.
महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेमार्फत रविवार दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षा इयत्ता 5 वी मधून सात विद्यार्थी पात्र ठरले आहेत. त्यामध्ये
*1)अथर्व गुंड (68.66%)*
*2)स्वरा पाटील (62.41%) ,*
*3)वेदांत बाबर(62%)*
*4)यश येडे (54%),*
*5)अंकिता निकत (51.33%)* ,
*6)नेहा नगरे(47.65%)*
*7)शिवम पवार(46.30%)*
तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षा इयत्ता 8वी मधून दोन विद्यार्थी
*1)संकेत पवार (53.37%) ,*
*2)दिया चौधरी (50%)*
हे सर्व विद्यार्थी शिष्यवृत्ती परिक्षेत पात्र ठरले आहेत. शिष्यवृत्ती परिक्षेत घेण्यात येणाऱ्या दोन्ही पेपर मध्ये 40% पेक्षा जास्त गुण मिळवणे आवश्यक असते.या सर्व विद्यार्थ्यांनी सर्व निकष पार करून अतिशय उत्कृष्ट यश संपादन केले आहे त्याबद्दल त्यांचे सर्व पालक वर्गातून अभिनंदन केले जात आहे.तसेच येणाऱ्या कालखंडामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये पात्र व्हावेत अशा शिक्षक व शाळेला शुभेच्छा दिल्या.या यशासाठी *दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.रामदास झोळ सर,यांनी स्कूलचे प्राचार्य श्री.विजय मारकड सर, प्रशालेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

60 mins ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

11 hours ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

1 day ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

1 day ago

करमाळा पोलिसांचा दणका ट्रॅक्टर चोरीचा छडा; ३.७५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत वीट येथील शेतातून ट्रॅक्टर लंपास; तांत्रिक तपासातून दोघे ताब्यात

करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…

1 day ago